एक्स्प्लोर
मेघालयमध्ये आमीरकडून पत्नीच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन

गुवाहटी/इटानगर : बॉलिवूड अभिनेता आमीर खान सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आमीर पत्नी किरण रावच्या वाढदिवसानिमित्त मेघालयमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन करत आहे. आमीरने पत्नी आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. किरणचा वाढदिवस खास बनवण्यासाठी मेघालयमध्ये आलो आहोत, असं आमीरने म्हटलं आहे. यापूर्वी आमीरने अरुणाचलमधील हॉलिडे सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. https://twitter.com/aamir_khan/status/795479034859655169 आमीरचा 'दंगल' सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात कुस्तीपटू महावीर फोगट यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. https://twitter.com/aamir_khan/status/794196235020304384
आणखी वाचा























