Aamir Khan Daughter Ira Khan Wedding : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात आमिर खानच्या (Aamir Khan) घरी आता लगीन घाईला सुरुवात झाली आहे. आमिरची लाडकी लेक इरा (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.


आमिरची लेक इरा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. इरा आणि नुपुर यांचा साखरपुडा मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटलीमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी खास पार्टीचं आयोजन करत सर्वांसोबत आपला आनंद शेअर केला होता. या पार्टीत आमिरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासह अभिनेत्री फातिमा सना शेखसह जवळचे कुटुंबिय उपस्थित होते. 


आमिरची लेक 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात (Ira Khan Nupur Shikhare Wedding)


इरा आणि नुपुर यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर चाहते त्यांच्या लग्नसोहळ्याची प्रतीक्षा करत होते. आता येत्या 3 जानेवारी 2024 रोजी इरा आणि नुपुर लग्नबंधनात अडकणार आहेत. 






न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, आमिर खानची (Aamir Khan) लेक इराच्या प्री-वेडिंग फंक्शनला आता सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी खान कुटुंबिय सज्ज आहे. बांद्रा येथील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 6 ते 10 जानेवारीदरम्यान त्यांचं रिसेप्शन असेल. दिल्ली (Delhi) आणि जयपूर या दोन ठिकाणी त्यांचं रिसेप्शन होणार आहे. काही दिवसांपूर्वी इरा आणि नुपुरचं थाटात केळवण पार पडलं होतं. 


महाराष्ट्र्रीयन पद्धतीने होणार इराचं लग्न


आमिर खान (Aamir Khan) आपल्या लेकीच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींना आमिर खान वैयक्तिकरित्या लग्नाचं आमंत्रण देत आहे. आमिरच्या लेकीच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या कलाकारांना लग्नसोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही ते जयपुर येथील रिसेप्शनला हजेरी लावतील. महाराष्ट्रीयन पद्धतीने इरा आणि नुपुर लग्नबंधनात अडकणार आहेत. 


संबंधित बातम्या


Ira khan Kelvan: थाटात पार पडलं आमिर खानच्या लेकीचं केळवण; आयरानं घेतला उखाणा, म्हणाली, "मला मराठी येत नाही पण..."