Rinku Rajguru Real Name:  अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सैराट चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रिंकूनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. रिंकू ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते.  रिंकूनं इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. रिंकूनं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


रिंकू नाही तर हे आहे सैराटच्या आर्चीच खरं नाव 


'तुझं टोपणनाव काय आहे?' असा प्रश्न एका नेटकऱ्यानं रिंकूला इन्स्टग्रामवर विचारला. या प्रश्नाला रिंकूनं उत्तर दिलं, 'रिंकू' त्यानंतर आणखी एका नेटकऱ्यानं रिंकूला प्रश्न विचारला, 'रिंकू हे तुझं टोपणनाव आहे तर मग तुझं खरं नाव काय आहे?' या प्रश्नाचं रिंकूनं उत्तर दिलं, 'प्रेरणा' रिंकूचं खरं नाव प्रेरणा आहे, हे अनेकांना माहित नसेल.





रिंकूच्या बॉयफ्रेंडचं नाव काय?


रिंकूला इन्स्टग्रामवर एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?' या प्रश्नाला रिंकूनं उत्तर दिलं, "बॉयफ्रेंड नाहीये त्यामुळे नाव पण नाहीये"




'झिम्मा-2 नंतर कोणता नवा प्रोजेक्ट येणार?' असा प्रश्न देखील एका युझरनं रिंकूला विचारला. या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं, 'लवकरच कळवते.'  2023 मधील तुझी सर्वात आवडती आठवण कोणती? असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाचं रिंकूनं केदारनाथच्या मंदिराजवळील फोटो शेअर करुन उत्तर दिलं. 


रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात  रिंकूसोबतच सुहास जोशी, निर्मिती सावंत,क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव आणि शिवानी सुर्वे  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.






रिंकूचा आगामी चित्रपट


रिंकूनं काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. तिचा  आशा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटामधील लूकचा फोटो रिंकूनं सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रिंकू ही  हिरवी साडी,गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर स्माईल अशा लूकमध्ये दिसली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Rinku Rajguru: ‘झिम्मा 2’ नंतर रिंकू राजगुरुचा 'हा' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणारा सिनेमा "