Aamir Khan Announces His Next Film: बॉलिवूडचा  'मिस्टर परफेक्शनिस्ट'  अशी ओळख असणारा आमिर खान (Aamir Khan) हा विविध विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करतो. त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकतीच आमिरनं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par)  या चित्रपटासोबत खास कनेक्शन आहे. 


आमिरच्या आगामी चित्रपटाचं नाव काय?


आमिरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आमिरनं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे. तो म्हणाला, 'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण  चित्रपटाचं नाव सांगू शकतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे  नाव आहे. तुम्‍हाला माझा 'तारे जमीन पर' हा चित्रपट आठवत असेल आणि या चित्रपटाचे नाव 'सितारा जमीन पर' आहे कारण त्याच थीमवर आधारित असणारा हा चित्रपट असणार आहे. पण आपण या चित्रपटामधून 10 पावले पुढे जात आहोत. 'तारे जमीन पर' हा भावनिक चित्रपट होता.  पण  'सितारा जमीन पर' हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल." 


कधी रिलीज होणार चित्रपट?


आमिरनं पुढे सांगितलं, "सितारे जमीन पर या चित्रपटात 9 मुलांची कथा दाखवली जाईल, जे अनेक समस्यांचा समना करत आहेत. हा चित्रपट पाहून तुम्हाला खूप मजा येईल असा दावा मी करू शकतो." आमिरचा हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे.  


 'तारे जमीन पर' हा चित्रपट 21 डिसेंबर 2007 रोजी रिलीज झाला.  या चित्रपटात आमिरसोबतच  दर्शील सफारीनं देखील काम केलं होतं.  'तारे जमीन पर' चित्रपटामध्ये दर्शील सफारीने इशान अवस्थीची भूमिका साकारली होती. अमोल गुप्ते आणि  आमिरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.  आता आमिरच्या सितारे जमीन पर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


आमिरचा  'लाहोर- 1947'   हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती  आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी करणार आहे. 


संबंधित बातम्या:


Sunny Deol New Project: 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओलच्या 'लाहोर- 1947' चित्रपटाची घोषणा; आमिर खान करणार निर्मिती