Hina Khan On Mahadev Online Gaming App Case : महादेव ऑनलाईन बुक अॅप (Mahadev Online Gaming App) प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या अॅप प्रकरणी अनेक बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी आता अभिनेत्री हिना खानची (Hina Khan) चौकशी होणार आहे. 


हिना खानची होणार चौकशी


महादेव बुक अॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री हिना खानला ईडीने समज देऊन चौकशीसाठी बोलावलं आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती महादेव बुक अॅप प्रमोट करताना दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाकाळात हिना खानने महादेव अॅप प्रमोट केलं असल्याचाही तिच्यावर आरोप आहे. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅन्डोर्समेंटही केली होती. 


एजंसीला संशय आहे की, हिनाने महादेवसह इतर अनेक अॅप्सचीही जाहिरात केली आहे. महादेव अॅपचे प्रवर्तक आणि हिना खान यांच्यातील करार आणि व्हवहारांची चौकशी करण्यासाठी ईडी हिना खानची चौकशी करणार आहे. हिनाला समन्स देऊन चौकशीसाठी बोलावल्यानंतर तिने दोन आठवड्याची वेळ मागितली आहे. 


ईडी लवकरच हिना खानला नवीन तारखेसह समन्स पाठवू शकते. यासह इतर काही अभिनेत्री आणि गायक यांचेदेखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. यात बॉलिवूडकर महादेव अॅपचं प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत.


नेमकं प्रकरण काय?


महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल अशा विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठीचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. याच अॅपची जाहिरात या बॉलीवूड अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी केला असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला देखील अनेकांनी हजेरी लावली होती. तर त्याच्या वाढदिवासाच्या कार्यक्रमाला देखील अनेक अभिनेते उपस्थित होते. तर त्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विविध परफॉर्म्सन्स देखील केले असल्याचा दावा ईडीकडून केला जात आहे. UAE मध्ये झालेल्या लग्नात सौरभने 200 कोटी रुपयांची उधळण केली आहे.


हिना खान कोण आहे? (Who is Hina Khan)


हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून हिना खानने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. या मालिकेसह 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'खतरों के खिलाडी 8','बिग बॉस 11' या कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली आहे. 


संबंधित बातम्या


Mahadev Online Gaming App : महादेव ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप प्रकरणी संजय दत्त, सुनील शेट्टीसह 34 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर!