Aamir Khan New Project: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांच्या 'लाहोर- 1947'  या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 'लाहोर- 1947' (Lahore 1947) या चित्रपटात सनी देओल हा प्रमुख भूमिका साकारणार असून आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करुन 'लाहोर- 1947'  या चित्रपटाची माहिती देण्यात आली आहे.


आमिर खान प्रॉडक्शन्सच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'AKP ची संपूर्ण टीम सनी देओल अभिनीत आणि राज कुमार संतोषी दिग्दर्शित  लाहोर-1947 या  चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंदी आहे. आम्ही अत्यंत  टॅलेंटेड सनीसोबत आणि आवडते  दिग्दर्शक राज कुमार संतोषी  यांच्यासोबत काम करण्यास  उत्सुक आहोत. आम्‍ही जो प्रवास सुरू केला आहे तो समृद्ध होण्‍याची अशा आम्ही बाळगतो. आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.' आता आमिर, सनी देओल आणि राज कुमार संतोषी  यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


आमिर खान प्रॉडक्शन्सच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'व्वा! माझे दोन आवडते अभिनेते  एकत्र येत आहेत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'गदर 2 प्रमाणेच हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर होईल.'






राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक'  यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. आता सनी देओल आणि  राजकुमार संतोषी यांचा लाहोर-1947 हा चित्रपट रिलीज होणार आहे.


सनी देओल हा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या गदर-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. गदर-2 चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षक सनीच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. गदर-2 या चित्रपटामध्ये सनी देओलसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. 


संबंधित बातम्या:


Gadar 2: शाहरुख खान-गौरी ते अजय- काजोल; गदर 2 च्या ग्रँड सक्सेस पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी