Anil Kapoor Play Role Aurangzeb in Chhava : 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या आगामी 'छावा' (Chhava) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. विकी कौशल (Vicky Kaushal) आणि 'रश्मिका मंदाना' (Rashmika Mandanna) या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या सिनेमासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) यांना विचारणा झाली असून ते औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.
'छावा' या सिनेमातील औरंगजेबाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारणा झाली असल्याचं समोर आलं आहे. 'छावा' या सिनेमाच्या टीमने याआधीही अनिल कपूर यांना विचारणा केली आहे. त्यामुळे अनिल कपूर आता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील.
'छावा' कादंबरीवर आधारित सिनेमा...
'छावा' हा पीरिअड ड्रामा असणार आहे. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या तर रश्मिका त्यांच्या पत्नीच्या अर्थात येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. मराठ्यांचा गौरव आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
'छावा' या सिनेमाच्या शूटिंगला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. 2024 पर्यंत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. मुंबई, वाई, भोर, जयपूर आणि महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.
विकी कौशलचे यावर्षात 'जरा हटके जरा बचके' आणि 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता त्याचा 'सैम बहादुर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी 'छावा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 14 ऑक्टोबरपासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार असल्याचा अंदाज आहे.
'छावा' या सिनेमासाठी विकी कौशलने 10 ते 12 किलो वजन कमी केलं आहे. 14 ऑक्टोबरपासून पुढचे 100 ते 150 दिवस 'छावा' सिनेमाचं शूटिंग सुरू राहणार आहे. 'छावा' या सिनेमासह विकीला 'बब्बर छेर' या सिनेमासाठीही विचारणा झाली आहे.
संबंधित बातम्या