8 Don 75 Teaser Out : '8 दोन 75' (8 Don 75) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. '8 दोन 75' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडेच्या या सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची मोठी चर्चा असून या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला '8 दोन 75' (8 Don 75 Marathi Movie Starcast)


अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार '8 दोन 75' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते संगीतबद्ध केलं आहे.






'8 दोन 75' कधी होणार रिलीज? (8 Don 75 Release Date) 


फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये 90 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने  केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरवरून चित्रपटाचा लुक अत्यंत फ्रेश दिसतो आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 


देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '8 दोन 75' या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, कमाल दिग्दर्शन अशा सर्व गोष्टी असल्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.


संबंधित बातम्या


8 Don 75 : संस्कृती बालगुडेच्या '8 दोन 75' सिनेमाला 50 हून अधिक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार