8 Don 75 Fkat Ichchashakti Havi : '8 दोन 75' (8 Don 75) या सिनेमाला आजवर 50 हून अधिक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी' या सिनेमाच्या नावातच वेगळेपण आहे. सुश्रुत भागवत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्यावर्षी या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने 50 हून अधिक पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे.
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात सिनेमाने पुरस्कार पटकावले आहेत.
सिनेमाची पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे. तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी सिनेमाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्समध्ये '8 दोन 75' सिनेमाला पुरस्कार मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha