Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना आता फक्त त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.


मुग्धाने हळद लागलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेक. फोटो शेअर करत तिने 'हरिद्रा लापन! घाणा भरणे', असं कॅप्शन दिलं आहे. तर प्रथमेशने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"हरिद्रा लापन! मांगलिक स्नान". मुग्धा आणि प्रथमेशने पारंपरिक थाटात हळद समारंभ साजरा केला आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 






मुग्धा आणि प्रथमेशला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मुग्धा आणि प्रथमेशचा साध्या पद्धतीत हळद समारंभ पार पडला असल्याने एकीकडे त्यांचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल केलं जात आहे. लग्नात तरी चांगल्या साड्या नेस, मोदक हळदीने पिवळा झाला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






मुग्धा आणि प्रथमेशची लव्हस्टोरी काय आहे? (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Love Story)


'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते. 2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांनी गाण्यांचे अनेक कार्यक्रम केले. या कार्यक्रमामुळे ते एकमेकांच्या चांगले संपर्कात आले आणि दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. 


मुग्धा कॉलेजमध्ये असल्यापासून प्रथमेशला तिला प्रपोज करण्याची इच्छा होती. पण एक दिवस कार्यक्रमाआधी तालीम सुरू असताना त्याने अखेर तिला विचारलं. पण तिने मात्र होकार द्यायला एक-दोन दिवस घेतले. दोन दिवसांनी मुग्धाने प्रथमेशला भेटायला बोलावलं आणि आपला होकार कळवला. 


संबंधित बातम्या


Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : "आमचा साखरपुडा झालेला नाही"; 'त्या' व्हायरल फोटोवर मुग्धा वैशंपायनची पहिली प्रतिक्रिया