Main Atal Hoon Teaser:  दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या बायोपिकची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच मै अटल हूं (Mai Atal Hoon) या चित्रपटाच्या टीझरचा रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधील अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


'मैं अटल हूं' या चित्रपटाचा एक अप्रतिम टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये अटल बिहारी बाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसत आहे. या चित्रपटाच्या टीझरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. टीझरमध्ये पंकज त्रिपाठी  हे राजकारणाविषयी बोलताना दिसत आहेत. 


डायलॉग्सनं वेधलं लक्ष 


"अब दूसरों को आदत डालनी होगी, अटल बिहारी वायपेयी को गिराकर दोबारा खड़े होते देखने की." हा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येत आहे."दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा" हा डायलॉग देखील टीझरमध्ये ऐकू येत आहे.


पाहा टीझर:






टीझरमधील पंकज त्रिपाठी यांचा गेटअप चाहत्यांना पसंत पडत आहे. चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत. टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं,"आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन." तर दुसर्‍या युजरने म्हटले की, " पंकजजी तुम्ही सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू कलाकार आहात."


कधी रिलीज होणार 'मैं अटल हूं'? (Mai Atal Hoon Release Date)


'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट  19 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


'कडक सिंह' हा चित्रपट  8 डिसेंबर 2023 रोजी  रिलीज झाला. या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूं' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Main Atal Hoon: "60 दिवस फक्त खिचडी खाल्ली"; अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी अशी केली तयारी