मुंबई : फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये चित्रपट गली बॉयने 13 अवॉर्ड्स आपल्या नावे केले. या शर्यतीत अनेक सेलिब्रिटी बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्सपासून वंचित राहिले. परंतु, अनेक बेस्ट कॅटगरीतील नामांकनासाठी पात्र असल्याचा नेटकरी दावा करीत आहेत. सगळे बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्स गली बॉयला दिल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर मीम्स शेअर करत फिल्मफेयर बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. ट्विटरवरही #BoycottFilmfareAwards हा हॅशटॅग ट्रेंन्ड होत आहे.


यूजर्स ट्विटरवर #BoycottFilmfareAwards हा हॅशटॅग वापरून अनेक मीम्स आणि पोस्ट शेअर करत आहेत. नेटकऱ्यांनी केसरी, सुपर 30, मिशन मंगल आणि छिछोरे या चित्रपटांचे पोस्टर्सचं कोलाज करून मीम्स शेअर केलं आहे. त्याचबरोबर लिहिलं आहे की, 'या चित्रपटांना फिल्मफेयरने पूर्णपणे इग्नोर केलं आहे.'











एका यूजरने लिहिलं आहे की, गली बॉय अॅमेझॉन प्राइमवर आहे. 'तेरी मिट्टी' गाण्याचे लिरिक्स आणि सुपर 30मधील हृतिक रोशनचा परफॉर्मन्स इग्नोर कसा केला जाऊ शकतो? लोकांना वेड्यात काढण्यासाठी फिक्स्ड अवॉर्ड्स आहेत. आपण असे अवॉर्ड शो पाहणं बंद केलं पाहिजे.











एक यूजरने अनन्या पांडेचं फनी मीम शेयर करत लिहिलं आहे की, असं स्ट्रगल करणाऱ्यांना पुरस्कार मिळणार.













एका यूजरने गली बॉय डायरेक्टर झोया अख्तरचा फोटो शेअर केला आहे.





गायक नेहा भसीन आणि गीतकार मनोज मुंतशिर यांचाही सपोर्ट


फिल्मफेयर अवॉर्ड्समध्ये बेस्ट लिरिक्स कॅटेगरीमध्ये केसरी चित्रपटातील गाणं 'तेरी मिट्टी'ला अवॉर्ड मिळालं नसल्यामुळे गीतकार मनोज मुंतशिरने अवॉर्ड शोला बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे.





त्यांनी ट्वीट करून सांगितलं की, 'ते ऑफिशिअली या अवॉर्ड शोला बॉयकॉट करत आहेत. त्यांच्या या बोल्ड स्टेपनंतर सिंगर नेहा भसीनने ट्वीट करून त्यांना सपोर्ट केला आहे.

संबंधित बातम्या : 

65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी

माधुरीकडून अवॉर्ड मिळाल्याने रणवीरचा आनंद गगनात मावेना; शेअर केला फोटो