मुंबई : रणवीर सिंह आपला बहुचर्चित चित्रपट 'गली बॉय'मुळे पुन्हा चर्चेत आहे. कारणही तसचं आहे, फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये 'गली बॉय'चाच बोलबाला पाहायला मिळाला. खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रणवीरसाठी हा पुरस्कार आणखी स्पेशल झाला, ज्यावेळी बॉलिवडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितने त्याला हा अवॉर्ड दिला.


रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माधुरीकडून अवॉर्ड स्विकारतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोला कॅप्शन लिहिलं आहे की, 'हा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास आहे आणि मी हा कधीच विसरू शकणार नाही की, फिल्मफेयर बेस्ट अॅक्टर ट्रॉफी मला इंडस्टीमधील ग्रेट अदाकारेच्या हातून मिळाली. ती सिल्वर स्क्रीनची लेजेंड आहे. वन अॅन्ड ओनली माधुरी दीक्षित. हा क्षण हृदयात आयुष्यभरासाठी राहणार आहे.'


दरम्यान, फिल्मफेयर अवॉर्ड 2020 मध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर गली बॉयने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. या चित्रपटाने बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट अॅक्ट्रेससह 13 पुरस्कार आपल्या नावे केले. याचसोबत या चित्रपटाने अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर फिल्म 'ब्लॅक'चे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. एवढचं नाहीतर या चित्रपटाला भारताकडून बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवलं होतं.


रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट '83' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात पत्नी दीपिका पादुकोणसोबत रणवीर लग्नानंतर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. क्रिकेट विश्वकप 1983वर आधारित हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त करण जौहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्येही रणवीर दिसून येणार आहे. या मल्टीस्टारर पीरियड ड्रामामध्ये मुघल साम्राज्याची कहानी दाखवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच रणवीरने आपला आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चं शुटिंग पूर्ण केलं.

संबंधित बातम्या : 

65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी

First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज

'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज

'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज