मुंबई :  बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतने काही दिवसापूर्वी आपल्या 'तेजस' या चित्रपटाची घोषणा केली होती. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला आहे. भारतीय बनावटीच्या 'तेजस' या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. एका साहसी फायटर पायलटची ही कथा आहे.

आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना कंगना म्हणाली, देशसेवा करताना अनेकदा महिलांनी बलिदान दिले आहे. परंतु महिलांनी दिलेल्या बलिदानाकडे कायमचं दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून मला भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट अद्याप माझ्या वाट्याला आलेला नव्हता. परंतु 'तेजस' या चित्रपटामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. तेजस देखील आवडेल अशी मला खात्री आहे. या चित्रपटामुळे तरूणांमध्ये देशभक्ती आणि गर्वाची भावना निर्माण होईल.


सत्यनिष्ठा, साहस, सन्मान या तीन गोष्टीवर आधारीत 'तेजस' या चित्रपटाची कथा आहे. सर्वेश मेवारद्वारा लिखीत आणि निर्देशित हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

गेल्या काही काळात कंगना प्रामुख्याने महिला प्रधान चित्रपटांना प्रधान्य देताना दिसत आहे. येत्या काळात तिचा आणखी एक महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कंगना रनौतचा 'पंगा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. 'पंगा'ला प्रेक्षक आणि समिक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट एका महिला कबड्डीपटूच्या आयुष्यावर आधारित आहे.

VIDEO | साडीपासून ट्युनिक कसं कराल? | स्टाईलबाजी | घे भरारी | एबीपी माझा



संबंधित बातम्या :

माधुरीकडून अवॉर्ड मिळाल्याने रणवीरचा आनंद गगनात मावेना; शेअर केला फोटो

65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी