एक्स्प्लोर

अक्षय कुमार रुग्णालयात तर 'राम सेतु'शी संबंधित 45 जण कोरोना पॉझिटिव्ह, चित्रीकरण थांबलं

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर त्याच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. परिणामी चित्रीकरण सध्या रोखलं आहे.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान अक्षय कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षयने आज सकाळी ट्वीटद्वारे रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगितलं. त्याने ट्विटरवर लिहिलं आहे की, "तुमच्या प्रार्थनांचा परिणाम दिसत आहे. माझी तब्येत ठीक आहे. पण खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मी अॅडमिट झालो आहे. लवकरच परत येईन. तुम्ही आपली काळजी घ्या."

 

 

अक्षय कुमारने नुकतीच मुंबईत आपला आगामी चित्रपट 'राम सेतु'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. 5 एप्रिल रोजी एका भव्य सीक्वेन्ससाठी  जवळपास 75 ज्युनियर आर्टिस्ट्स आणि इतर लोकांसह 'राम सेतु'चं चित्रीकरण मुंबईच्या मड आयलंड परिसरात एका भव्य सेटमध्ये होणार होतं.  पण चित्रीकरण सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच जेव्हा सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधील 75 पैकी 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी एबीपीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 'राम सेतु'चं चित्रीकरण सध्या रोखलं आहे.

याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एबीपीने अक्षय कुमारची टीम आणि 'राम सेतु'चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा या दोघांशी संपर्क केला, परंतु बातमी प्रकाशित होईपर्यंत या दोघांकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं.

'राम सेतु'चं चित्रीकरण सुरु करण्याआधी अक्षय कुमारने जॅकलीन फर्नांडिस, नुशरत भरुचा अयोध्येत राम ललाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
Sai Tamhankar Bol Bol Bol Rani Movie Song: सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
Embed widget