Bollywood stars marriage : लग्न हा आयुष्यातील फार महत्वाचा इव्हेंट असतो. लग्न केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदारी वाढते. आपण आपला असा जोडीदार निवडतो, जो आयुष्यभर आपल्या सोबत राहणार असतो. दरम्यान, बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत. ज्यांचे लग्न केल्यानंतर नशीब चांगलच फळफळलंय. घरात लक्ष्मीचे पाऊल पडताच बॉलिवूडमधल्या या सेलिब्रिटींचे नशीबचं पालटले होते. लग्न झाल्यानंतर ते सुपरस्टार झाले. या यादीत अभिनेता किंग शाहरुखपासून (Sharukh Khan)  ते अमिताभ बच्चनपर्यंत (Amitabh Bachchan) अशा अनेक दिग्गज कलाकारांचे नावं आहेत. 


आयुष्मान खुरानाने ताहिराशी केला होता विवाह (Ayushmann Khurrana) 



आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) ताहिरा कश्यप हिच्यासोबत 2008 मध्ये विवाहबंधनात अडकला होता. त्यानंतर त्याचे नशिब चांगलेच पालटले होते. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले आहेत. डॉक्टर जी, बाला, ड्रीम गर्ल 2 आणि बधाई हो, असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय. 


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)


बॉलिवडूचा खिलाडी अक्षय कुमारने 2001 मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अक्षय वेगळ्या उंचीवर पोहोचलाय. कॉमेडी, अॅक्शन, बायोपिक, थ्रिलर असलेल्या विविध सिनेमांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. 


अभिनेता हृतिक रोशनने सुजैन खानशी केले होते लग्न 


हृतिक रोशन आणि सुजैन खान यांनी 2000 साली लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर हृतिकने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले. मात्र, पुढील काळात हृतिक आणि सुजैन यांनी घटस्फो घेतला होता. हृतिकने जोधा अकबर पासून सध्याच्या फायटर पर्यंत हिट सिनेमे केले आहेत. सध्या दीपिका आणि हृतिक ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 


या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव आहे. त्यांनी जया बच्चन यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांच्यानंतर बच्चन हे दुसरे सुपरस्टार आहेत. सध्या त्यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. अयोध्येत आलीशान घर बांधण्याचा बच्चन यांचा विचार आहे. 


बॉलिवूडचा किंग खान (Sharukh Khan) 


किंग खान शारुखने गौरी खान बरोबर लग्न केले. त्यानंतर दोघे कायम सोबत दिसत आले. गौरीशी विवाह केल्यानंतर शारुखने एकापाठोपाठ एक हिट सिनेमे केलेत. मागील वर्षात शारुख जवान आणि पठाण या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. सध्या गौरी खान रेड चिलीज प्रॉडक्शनच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. 


विवेक ओबेरॉय 


बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने प्रियंका अल्वा हिच्याशी लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर लगेच त्याला कृष्णा 3 या सिनेमाची ऑफर मिळाली होती. विवेक आता इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दीपिका आणि हृतिक प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


सैफ अली खान वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी केला होता विवाह 


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने अमृता सिंह हिच्या बरोबर विवाह केला होता. त्यानंतर त्याचे अनेक सिनेमे चांगलेच गाजले होते. मात्र, पुढील काळात सैफ आणि अमृता वेगळे झाले. सैफने बॉलिवूडची बेबो करिना कपूर हिच्याशी विवाह केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


दीपिका पादूकोण पडली आजारी, आता 'फायटर'च्या इव्हेंटला मारणार दांडी