Deepika Padukone : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या आगामी फायटर या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फायटर या सिनेमाच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनिल कपूर, अक्षय ऑबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सोमवारी (दि.15) पोंगल आणि मकर सक्रांतीच्या मुहूर्तावर फायटरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी दीपिकाने एक वाईट बातमी शेअर केली आहे. 


दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने तिचे दु:ख व्यक्त केले आहे. आज ती फायटरच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभाग होऊ शकणार नाही. तिने फायटरला शुभेच्छा देत लिहिले की, "मी माझ्या फायटरच्या टीमला मिस करेल.  गुड लक टीम! (पंच दर्शवणारे इमोजी) #फाइटर #फाइटरट्रेलर” याच पोस्टमध्ये तिने एक इमोजी शेअर केले आहे. या इमोजीमधून तिने आजारी असल्याचे सांगितले आहे. 


'फायटर' मधील कलाकारांच्या भूमिका


 सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेला फायटर हा चित्रपट  भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांवर आधारित आहे, ज्यामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर हे या चित्रपटात कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिक आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. 


 














इतर महत्वाच्या बातम्या


Amitabh Bachchan : 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा, अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी; तब्बल 14 कोटी खर्च करत घेतला मोठा निर्णय