मुंबई  : बॉलिवूडची दुनिया मोठी लुभावणारी हे. या क्षेत्रात एकदा जम बसला की नाव आणि प्रसिद्धी असं दोन्हीही मिळतं. पण याच बॉलिवुडच्या मोहात पडून आपलं आयुष्य पणाला लावणारेही अनेकजण तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिवूडमध्ये इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत, ज्यांची उत्तर अजूनही कोणालाच सापडलेली नाहीत. बॉलिवूडमधील काही अभिनेते, अभिनेत्रींचा मृत्यू जगासाठी आजही गुढ बनून राहिलेला आहे. यामध्येच आपला काळ गाजवणाऱ्या प्रिया राजवंश (Priya Rajvansh Murder Mystery) यांच्या मृत्यूचाही समावेश होतो. त्यांच्या मृत्यूला आज अनेक वर्षे उलटून गेली. पण त्यांचा मृत्यू जगासाठी आजही एक गुढ आहे. त्यांची हत्या करण्यात आली होती, असं म्हटलं जातं. पण ही हत्या नेमकी कोणी केली? त्यामागे कारण काय होतं? हे आजही अनुत्तरीत आहे. 


पोलिसांना वाटलं की नैसर्गिक मृत्यू झाला, पण...


प्रिया राजवंश यांच्या मृत्यूचं गुढ  आजही ग्लॅमरस वर्ल्डमध्ये गाडलं गेलेलं आहे. बॉलिवडूमध्ये असताना त्यांच्या सौंदर्याची तसेच त्यांनी केलेल्या अभिनयाची सगळीकडे चर्चा व्हायची. मात्र त्यांच्या मृत्यूचे गुढ आजही तसेच कायम आहे. सुरुवातीला प्रिया राजवंश यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता, असे सांगितले जात होते. मात्र चौकशी केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र ही हत्या कोणी केली, ते अद्याप गुढत आहे. 


देव आनंद यांच्या भावाने प्रिया यांना पाहिलं अन्...


प्रिया राजवंश यांचा जन्म 30 डिसेंबर 1936 मध्ये झाला होता. त्यांचे वडील सुंदर सिंह हे शासकीय अधिकारी होते. त्यांचे लहानपणीचे नाव वीरा सुंदर सिंह असे होते. त्यांचे शालेय तसेच पदवीचे शिकक्षम शिमला येथे झाले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली लंडनला झाली होती. त्यामुळेच वीरा यांनी पुढचे शिक्षण लंडनमध्ये रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स या संस्थेत घेतले. त्यांना चित्रपटांत रस होता. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर त्यांनी मॉडलिंग चालू केली. मॉडेलिंगच्या काळातही त्यांची सगळीकडे चर्चा व्हायची. प्रत्येकजण ही मुलकी कोण आहे? असं विचारायचं. त्यानंतर अभिनेता देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद यांनी हकीकत या चित्रपटात अभिनेत्री म्हणून निवडलं. त्यानंतर वीरा यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 


चेनतय आनंद यांच्यावर प्रेम 


प्रिया आणि चेतन आनंद यांचा हकीकत हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, प्रिया आणि चेतन आनंद यांच्यात जवळीक वाढली. चेतन आनंद यांनाही प्रिया खूप आवडली होती. पुढे दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. चेतन हे प्रिया यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. यासोबतच चेतन आनंद हे अगोदरपासूनच विवाहित होते. असं म्हणतात की हे देघे काही काळासाठी लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न मात्र कधी केले नव्हते. 


चेतन आनंद यांचा मृत्यू झाला वाईट दिवस चालू झाले


चेतन आनंद यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती. या दोन्ही मुलांना मात्र चेतन आणि प्रिया यांचं नातं पसंद नव्हतं. चेतन आनंद यांनी आपल्या मृत्यूपत्रात केलेल्या तरतुदीनंतर हा द्वेष जास्तच वाढला. चेतन आनंद यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग  आपल्या दोन्ही मुलांसह प्रिया राजवंश यांनादेखील दिला होता. पुढे 1997 मध्ये चेतन आनंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रिया राजवंश यांचा कठीण काळ चालू झाला. 


प्रिया राजवंश यांची हत्या झाल्याचे समोर


प्रिया राजवंश चेतन आनंद यांच्या जुहू येथील बंगल्यात राहायच्या. त्या कोणाशीच बोलायच्या नाहीत. त्या बंगल्याच्या बाहेरी निघायच्या नाहीत. त्यानंतर 2007 मध्ये प्रिया राजवंश या जुहू येतील बंगल्यात मृत आढळल्या. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले, हे कोणालाच समजू शकले नाही. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीतून प्रिया राजवंश यांची हत्या झाल्याचे समोर आले होते. 


चेनत आनंद यांच्या मुलांनीच केली हत्या ?


त्यानंतर चेतन आनंद यांचे केतन आणि विवेक या दोन मुलांना प्रिया राजवंश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सोबतच दोन नोकरांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. प्रिया राजवंश यांनी एक डायरी लिहिली होती. याच डायरीत त्यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. याच हत्या प्रकरणात चेतन आनंद यांची दोन्ही मुलं आणि दोन नोकरांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती. वरिष्ठ न्यायालयाने 2011 साली पुराव्याअभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं.  


हेही वाचा :


मन जुळलं, साखरपुडाही झाला, पण रेशीमगाठ जुळलीच नाही, 'असे' स्टार्स ज्यांचं लग्नाचं स्वप्न अधुरंच राहिलं!


पुष्पा-2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आता पुष्पा-3 येणार, भारतभरात रॅम्पेज होणार; जाणून घ्या काय असेल स्टोरी?


हातात प्लॅस्टिकची बॅग अन् पाठमोरी आकृती, ब्रेस्ट कॅन्सरविरोधात लढणाऱ्या हिना खानचा हॉस्पिटलमधील फोटो समोर, हळहळून अनेकांनी...