मन जुळलं, साखरपुडाही झाला, पण रेशीमगाठ जुळलीच नाही, 'असे' स्टार्स ज्यांचं लग्नाचं स्वप्न अधुरंच राहिलं!
बॉलिवुडध्ये अभिनेता, अभिनेत्रींच्या प्रेमकरणाची सगळीकडेच चर्चा होते. काही अभिनेता, अभिनेत्रींची लव्ह स्टोरी यशस्वी ठरते. तर काही प्रेमी युगुलांचे नंतरच्या काळात ब्रेकअपही होते. काही काही स्टार्सचा तर साखरपुडाही झालेला होता, पण तरीदेखील त्यांचे लग्न होऊ शकले नाही. याच पार्श्वभूमीवर प्रेमात पडून साखरपुडा होऊनही लग्नबंधनात न अडकू शकलेल्या बॉलिवूडच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खान आणि संगीता बिजलानी हेदेखील एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही निश्चित केली होती, असे म्हणतात. मात्र त्यांचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन हेदेखील एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता, असे म्हटले जाते. मात्र पुढे या प्रेमाचा शेवट ब्रेकअपने झाला. त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
रश्मिका मंदाना हा दक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील सर्वप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा 2017 साली रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता, असे म्हटले जाते. मात्र त्यांचे पुढे लग्न होऊ शकले नाही.
साजिद खान आणि गौहर खान हे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची सगळीकडे चर्चा असायची. मीडियातील रिपोर्ट्सनुसार या दोघांचा साखरपुडादेखील झाला होता. मात्र त्यांचे लग्न मात्र होऊ शकले नाही.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा 2002 साली एन्गेजमेंट झाला होता. मात्र लग्नाच्या काही अगोदर त्यांचे लग्न मोडले. पुढे करिश्मा कपूरने संजय कपूर यांच्याशी तर अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न केलं.