Blockbuster Horror Comedy Su From So: 'कांतारा'च्या तोडीस तोड 'ही' फिल्म, बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT वर करतोय ट्रेंड, 8.5 रेटिंग
Blockbuster Horror Comedy Su From So: 'सु फ्रॉम सो' हा कन्नड सिनेमा सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांना तर या सिनेमाची भूरळंच पडलीय.

Blockbuster Horror Comedy Su From So: सध्या एक कन्नड सिनेमा (Kannada Cinema) प्रचंड गाजतोय. प्रेक्षकांना तर या सिनेमाची भूरळंच पडली आहे. चक्क या सिनेमाचं वर्णन 'केजीएफ' (KGF), 'कांतारा'ला (Kantara Movie) टक्कर जेणारा सुपरहिट सिनेमा (Superhit Cinema) असं केलं जातंय. बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालल्यानंतर, सध्या हा सिनेमा ओटीटीवर (OTT) धुमाकूळ घालतोय. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे, ज्यामध्ये असलेले जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना चक्कर आणत आहेत. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) सध्या ट्रेंड करतोय.
चित्रपटाचं नाव 'सु फ्रॉम सो' (Su From So) आहे. त्याचा मुख्य नायक राज बी शेट्टी हाच या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये आला. चित्रपटाचं जास्त प्रमोशन झालेलं नाही, पण प्रेक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं आहे, ज्यामुळे लोक आज त्याची जोरदार चर्चा करत आहेत. चित्रपटाला तोंडी खूप फायदा झाला. आयएमडीबीनं त्याला 8.5 रेटिंग दिलं आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. सध्या, हा सिनेमा तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या हिंदी आणि तमिळ आवृत्त्यांसाठी प्रेक्षकांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते.
गावकऱ्यांची रंजक कहाणी पोट धरून हसवते
'सु फ्रॉम सो' चित्रपटात एका गावाची कहाणी दाखवण्यात आली आहे, जिथे लोक खूप प्रेमानं एकत्र राहतात. गावकरी अण्णा नावाच्या माणसाचा खूप आदर करतात, म्हणून ते त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्याच्याकडे जातात. दुसरीकडे, अशोक नावाचा एक माणूस एका मुलीवर प्रेम करतो. गावात अशोकबद्दल अफवा पसरतं की, त्याला भूत लागलं आहे. कथेत प्रकाशचं पात्र देखील महत्त्वाचं आहे, ज्याला भूत लागलं आहे. सुलोचना त्याला पछाडत असल्याचं उघड झालंय. हॉरर कॉमेडीमध्ये एक मेसेजही लपला आहे.
View this post on Instagram
जगभरात 121 कोटी रुपयांचा कलेक्शन
'सू फ्रॉम सो' हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटानं 41 दिवसांत थिएटरमधून भरपूर कमाई केली. राज बी शेट्टी, शनील गौतम, जेपी तुमिनद आणि पुष्पराज बोलेर, प्रकाश तुमिनद यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं देशभरातील बॉक्स ऑफिसवरून 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. तर जगभरातील चित्रपटाचा कलेक्शन 121 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IMDb वर 7.1 रेटिंग, अंगावर काटा आणणारी स्टोरी, 50 मिनीटानंतर येतो ट्वीस्ट; सिनेमाची तुफान चर्चा























