एक्स्प्लोर

Bigg Boss: विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी

Vishal Kotian Back in the Game: फिनाले आधी विशालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. विशाल कोटियनचं इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरु झालं.

Vishal Kotian Instagram Account Recovered: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) सहावा सिझन अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये सध्या ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.  या शोमध्ये आता तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियनमध्ये (Vishal Kotian) बिग  बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून विशाल कोटियन बिग बॉसच्या घरात चर्चेत राहणारा स्पर्धक ठरला. यंदाच्या सिझनचा विशाल मास्टरमाइंड ठरला.  त्यानं उत्तम टास्क खेळून बिग बॉसच्या घरात एक वेगळी जागा निर्माण केली. 

विशालचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू (Vishal Kotian Instagram account recovered Bigg Boss Marathi 6 finale)

विशाल कोटियनचा बिग बॉसच्या घरातील प्रवास सोपा नव्हता.  त्याला काही जण यंदाच्या सिझनचा मास्टरमाइंड म्हणतात.  काही दिवसांपूर्वी विशालचं राकेश बापटबरोबर भांडण झालं. वैयक्तिक आयुष्यावरुन टीका केल्यामुळे बिग बॉसने विशालला शिक्षा दिली. संपूर्ण सिझन त्याला नॉमिनेट करण्यात आलं. या काळात तो  बिग बॉसच्या घरात एकटा पडला. अलिकडेच त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झालं होतं. विशालचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होण्यामागचं  कारण काही समोर आलं नाही. यानंतर विशालचे चाहते संभ्रमात होते.  दरम्यान, विशालच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. 

विशालचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा सुरु झालं आहे.  त्यामुळे त्याच्या चाहत्यांना निश्चितच आनंद झाला आहे.  विशाल कोटियन आणि रुचिता जामदार या दोघांचं अकाऊंट बंद झालं होतं. फिनाले आठवड्यात  असं घडल्यामुळे चाहत्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सोशल मीडियावरील एंगेजमेंटही पाहिले जाते.  विशालचं अकाऊंट बंद झाल्यामुळे त्याचा थेट  परिणाम व्होटिंग प्रक्रियेवरही बसला असता. दरम्यान, त्याचं अकाऊंट आता पुन्हा सुरु झालं आहे. विशालच्या टीमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच चाहत्यांना  ही आनंदाची बातमी शेअर केली.  विशालला भरभरुन सपोर्ट करूयात, असं  पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

विशालच्या टीमकडून पोस्ट शेअर (Vishal Team Share Instagram Post)

'सर्व बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.  विशाल कोटियनचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा रिकव्हर झालं आहे. या प्रक्रियेत मदत केल्याबद्दल कलर्स मराठी आणि जिओ टीमचे आभार.  आता फुल एनर्जीने सुरुवात करुयात.  व्होटिंग सुरु करुयात.  विशालला भरभरुन सपोर्ट करुयात...', सध्या ही पोस्ट व्हायरल होत असून, विशालच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget