एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: अखेर, 'त्या' स्पर्धकाला दाखवला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता; नाव समोर आलं; प्रेक्षकही म्हणाले...

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे.

Bigg Boss Marathi 6: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीचे सहावे पर्व (Bigg Boss Marathi 6) चांगलेच चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला संकेत पाठक दोघांनाही घराबाहेर पडावं लागलं. आता बिग बॉसच्या घरात केवळ आठ सदस्य राहिले आहेत. आठवडाभरानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोणाचा एलिमिनेशन होणार याची. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोखाली येत असणाऱ्या कमेंट्समध्ये चाहते या स्पर्धकाला घराबाहेर काढा अशा मागण्या कायम करताना दिसतात. आता अनेक दिवसांपासून ट्रॉल होणारं एक नाव  बिग बॉसच्या घराबाहेर पडणार आहे. या स्पर्धकाचं नावही समोर येताना दिसतंय. (BBM6 Eviction)

कोण झालं एलीमिनेट?

बिग बॉस मराठी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे.  बिग बॉसच्या घरातील शेवटची कॅप्टन होण्याचा मान रेवा कौरासेला मिळाला. त्यामुळे रेवा सेफ आहे. तिच्यानंतर राखीच्या नावाची चर्चा होती पण राखी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचा गेमचा ग्राफही चांगला असल्याचीच चर्चा आहे. त्यामुळे राखीही घराबाहेर पडलेली नाही. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकाचे नाव सागर कारंडे असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून सागर प्रचंड ट्रोल होतोय. त्याला घरातून बाहेर काढण्याची ही मागणी वारंवार होताना दिसते. सागर घराबाहेर गेल्याचा समजताच प्रेक्षकांनीही हा बिग बॉसचा बेस्ट डिसिजन असल्याचा म्हटलंय. तर काहींनी सागरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा कौतुक केलंय. एक प्रगल्भ अभिनेता बिग बॉसच्या घराबाहेर पडल्याचा कळाल्याने अनेक चाहत्यांना धक्काही बसलाय. अद्याप, सागरच्या नावाची केवळ चर्चा असून अद्याप अधिकृत नाव जाहीर झालेले नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सागरला गेल्या तीन वर्षांपासून बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण होतं. पण यावेळी त्यांनी स्वीकारले. पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंनी त्याच्या खेळाचं कौतुक केलं होतं. त्याची आणि राखीची जोडी प्रेक्षकांना चांगलंच हसवताना दिसली. सागरने त्याचा गेममधूनही तो चांगला स्पर्धक असल्याच सिद्ध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावरही ट्रोल होताना दिसतोय. त्याच्या गेमविषयीही प्रेक्षकांमध्ये नाराजी होती. बिग बॉस मराठीच्या घरात आता एकूण आठ सदस्य आहेत. यामध्ये रेवा कौरासे, राखी सावंत, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, सागर कारंडे, दिपाली सय्यद, विशाल कोटियन यांचा समावेश आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सागर, राखी, राकेश, रेवा आणि विशाल हे सदस्य नॉमिनेट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Embed widget