एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: आज विषय गंभीर! राकेश विशाल राड्यानंतर रितेश भाऊंची सहनशक्ती संपली; म्हणाले 'धक्के देण्याची वेळ.. '

नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील वातावरण गंभीर झालं आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन आता अंतिम टप्प्यावर आला आहे. (Bigg Boss Marathi6) मागील काही दिवसांपासून घरातून धक्कादायक एलिमिनेशन झाल्याने घरातील स्पर्धकांना आणि प्रेक्षकांनाही मोठे धक्के बसले. आता शेवटच्या दिवसांमध्ये बिग बॉसचा गेम आणखी कठीण होत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक आपला टॉप गेम दाखवत आहे. आता पुन्हा एकदा आठवड्याचा शेवट आलाय आणि प्रेक्षकांना ज्यांच्याकडे आतुरतेने वाट पहात असतात ते रितेश भाऊ (Riteish Deshmukh) आज भाऊचा धक्क्यावर कोणाची खरडपट्टी काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेल्या आठवड्यात राकेश आणि विशालमध्ये झटपट झाली. (Rakesh Vishal Fight) नॉमिनेशनच्या वेळी त्या दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवरून खडाजंगी झाली. मामला हाणामारीपर्यंत पोहोचला. आता भाऊचा धक्क्यावर रितेश भाऊ दोघांनाही धक्के देणार आहेत. नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील वातावरण गंभीर झालं आहे.

बिग बॉसचा प्रोमो व्हायरल

कलर्स मराठीने काही तासांपूर्वीच भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो प्रेक्षकांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रमोद आठवडाभर झालेल्या वादावादीचे, राड्याचे, एकमेकांचा पाणउतारा केल्याच्या काही क्लिप्स जोडल्या आहेत. रितेश भाऊ भाऊचा धक्क्यावर एन्ट्री घेतात तेव्हा ' भाऊचा धक्क्यावर आज वातावरण गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. नंतर स्पर्धकांच्या एकमेकांच्या अंगावर जातानाच्या आणि या आठवड्यात जे जे एकमेकांना नडले त्यांच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या. घरातील स्पर्धकांना आता काही धक्के देण्याची वेळ आली आहे, असं रितेश भाऊ म्हणताना दिसतात. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का नेहमीपेक्षा जरा जास्त सिरियस झाल्याचं प्रेक्षकही म्हणत आहेत. अनेकजण या आठवड्यात कोणाला बाहेर काढावं हेही सुचवत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कोण धरणार घरचा रस्ता?

मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला संकेत पाठक दोघांनाही घराबाहेर पडावं लागलं. प्रभू ने बाहेर आल्यानंतर तन्वी कोलते बिग बॉसची विजेती व्हावी असं म्हटलं. दरम्यान रितेश भाऊ आज कोणाची शाळा घेणार आणि आठवड्यात कोण घरचा रस्ता धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या घरात सध्या आठ सदस्य आहेत. यात तन्वी, अनुश्री, सागर, राखी, राकेश, रेवा, दिपाली, विशाल यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget