Bigg Boss 20 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
Bigg Boss 20 Captaincy Task: 'बिग बॉस सिझन 20'च्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.

Bigg Boss 20 Gullu Becomes Second Captain: 'बिग बॉस सिझन 20' (Bigg Boss 20) या रिअॅलिटी शोने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सुरूवात केलीये. पहिल्या आठवड्यात या रिअॅलिटी शोचा कॅप्टन यंग डीसीए (Yung DSA) बनला होता. घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असल्याचं पाहायला मिळालं. कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली. या शोमध्ये 'गर्ल्स वर्सेस बॉइज' दोन विभागात घरात फूट पडली. रंग फेकण्याच्या टास्कमध्ये घरात वाद निर्माण झाला होता. 16 सप्टेंबरच्या एपिसोडने प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन केलं. दरम्यान, दुसरा कॅप्टन (Bigg Boss Captain) कोण होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.
'बिग बॉस सिझन 20'मध्ये घरातील दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी स्पर्धकांना अनोखे टास्क दिले होते. नियमानुसार, घरातील महिला सदस्यांना पुरुषांवर रंग फेकायचे होते. तर, पुरुषांना स्वत:चा बचाव करायचा होता. या बचावासाठी त्यांना सोफा, खुर्च्या, आणि उशा वापरण्याची परवानगी होती. या टास्कदरम्यान, स्काउट आणि अरिश्फा खान यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, स्काऊटने कॅमेऱ्यासमोर आपल्या गेमिंग आणि यूट्यूब ग्रु्प्सना 'फिनिश इट' असा सिग्नल दिला.
'बिग बॉस'च्या घरातील दुसरा कॅप्टन कोण? (Bigg Boss 20 Gullu Becomes Second Captain Contestant)
View this post on Instagram
टास्कच्या दुसऱ्या राऊंडमध्ये कनिकाला संचालकची जबाबदारी देण्यात आली होती.'बिग बॉस सिझन 20'च्या घरात किचन पॉलिटिक्सही पाहायला मिळालं. कनिकाने गुल्लूला काही पदार्थ करण्यासाठी सांगितले होते. तर दुसरीकडे आम्रपालीने ठामपणे कुणासाठीही स्वंयपाक करणार नाही, असं सांगितलं. कॅप्टन्सीसाठी पुढची फेरी सुरू होते. यात अरिश्फाला संचालक केलं जातं. या राऊंडमध्ये आसिफ, अमन आणि गुल्लू पांढऱ्या कपड्यांमध्ये मैदानात उतरतात. आसिफ आणि अमन यांच्यात जोरदार वाद होतो. अरिश्फाने आसिफ आणि अमनला बिग बॉसच्या सांगण्यावरुन बाहेर काढले. ज्यामुळे गुल्लू या सिझनचा दुसऱ्या कॅप्टन्सीचा दावेदार ठरला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















