Laapataa Ladies Box Office Collection Day 2: 'लापता लेडीज' (Laapataa Ladies Box Office Collection ) हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 1 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचं देखील भरभरुन प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने कोट्यावधींचा टप्पा पार केलाय. बॉक्स ऑफिसवर वीकेंडची जादू या सिनेमाने केलीये. लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव (Kiran Rao)यांनी केलंय. 


SACNILC च्या रिपोर्टनुसार, लापता लेडीज या चित्रपटाने पहिल्या दिवशी 70 लाखांची कमाई केली होती. अवघ्या 5-6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी पहिल्याच दिवशी 70 लाखांची कमाई ही चांगली झाली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान आता दुसऱ्या दिवसाची देखील आकडेवारी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, लापता लेडीज या चित्रपटाने आतापर्यंत  1.34 कोटी रुपयांची कमाई दुसऱ्या दिवशी केलीये. 


लापता लेडीजची स्टारकास्ट


आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीये. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केलंय. या चित्रपटाच्या माध्यमातून किरण राव बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनाकडे वळली आहे.  रवी किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.


काय आहे सिनेमाची गोष्ट?


लापता लेडीज ही दोन महिलांची गोष्ट आहे. नवीनच लग्न झालेला दीपक आपल्या बायकोला घेऊन त्याच्या गावी जातो. पण घरात नवरीचा पदर उचलला की सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. फूल कुमारीशी लग्न करायला गेलेला दीपक, पुष्पाला घरी घेऊन येतो. फुल कुमारी कुठे आहे आणि पुष्पा कोण आहे याचे रहस्य सोडवून या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.


ही बातमी वाचा : 


Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : फिनालेआधीच 'झलक दिखला जा 11'च्या विजेत्याचं नाव समोर; जाणून घ्या महाअंतिम सोहळ्यासंबंधित सर्वकाही