Abhishek Ghosalkar Death Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी नेमलेल्या वकिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. "अमरेंद्र मिश्राची त्यादिवशीची हालचाल संशयास्पद होती. याबाबतचे सीसीटीव्ही आम्ही न्यायालयात सादर केले आहे. अमरेंद्र मिश्रा डिसेंबरमध्ये त्याच्या बंदुकीसह मुंबईत आला. त्याची कल्पना त्याने स्थानिक पोलिसांना देणे गरजेचे होते. कुठल्याही परिस्थितीत मॉरीसने चुकीच्या पद्धतीने मिश्राकडून बंदुक घेतली असं सिद्ध होत नाही", असा दावा घोसाळकर कुटुंबियांचे वकिल भुषण महाडिक यांनी केले आहेत. न्यायलयाने या प्रकरणाची सुनावणी 5 मार्चपर्यंत तहकूब केली आहे. 


काय म्हणाले भुषण महाडिक ?


अमरेंद्र मिश्राची त्यादिवशीची हालचाल संशयास्पद होती. याबाबतचे सीसीटीव्ही आम्ही न्यायालयात सादर केले आहे. तो डिसेंबरमध्ये त्याच्या बंदुकूसह मुंबईत आला त्याची कल्पना त्याने स्थानिक पोलिसांना देणे गरजेचे होते. कुठल्याही परिस्थितीत मॉरीसने चुकीच्या पद्धतीने मिश्राकडून बंदुक घेतली असं सिद्ध होत नाही. त्याचा सहभाग नाही असं म्हणता येत नाही.


काही संशयास्पद आर्थिक व्यवहार देखील झाले 


मिश्राकडून काही संशयास्पद आर्थिक व्यवहार देखील झाले आहे त्याची चौकशी गंभीरतेने व्हावी. त्याने काही बुलेट्स मुंबईच्या अब्दुल रहमान स्ट्रीटवरुन विकत घेतल्या होत्या. मिश्राला जामीन नाकारुन चौकशीचे आदेश द्यावे, असा युक्तीवाद तेजस्विनी घोसळकर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. 


कोण आहे अमरेंद्र मिश्रा?


आरोपी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा काही महिन्यांपूर्वीच वैयक्तिक सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र या प्रकरणा नंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अमरेंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. आरोपी अमरेंद्र मिश्राने पिस्तुलाचा परवाना उत्तर प्रदेशातून काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडील पिस्तुलाची नोंदणी मुंबईत करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी सांगितले होते. 


कशी झाली होती घोसाळकरांची हत्या?


ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या कथित आरोपी मॉरिस यानेही स्वत:वर गोळीबार करुन जीवन संपवले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दोन्ही हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या प्रकरणात मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


Kripashankar Singh : भाजपची 'कृपा' फळाला आली! काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशात उमेदवारी