Abdu Rozik : 'बिग बॉस 16' (Bigg Boss) मधून भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला  प्रसिद्ध गायक आणि 'दुबई के छोटे भाईजान' अब्दू रोजिक ( Abdu Rozik) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वत:हा अब्दुने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अब्दुने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे. तसेच त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच यामध्ये त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी जी अंगठी विकत घेतली त्याची देखील झलक दाखवली आहे. 


अब्दु हा बिग बॉसमुळे घराघरात पोहचला. त्यानंतर त्याचा मोठा चाहतावर्गही तयार झाला. त्यातच आता अब्दुने त्याचं लग्न जाहीर केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसल्याचं चित्र आहे. तसेच अब्दुने या व्हिडिओमधून त्याच्या लग्नाची तारीख देखील जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अब्दुला आता त्याच्या खऱ्या आयुष्यातला जोडीदार सापडला असून लवकरच तो त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. 


मी माझा आनंद शब्दांत व्यक्त करु शकत नाही - अब्दु


अब्दुने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मी इतका भाग्यवान असेल असा मी माझ्या आयु्ष्यात कधीच विचार केला नव्हता. मला असा जोडीदार मिळाला आहे, जो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि आदरही करतो. त्यामुळे 7 जुलै ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. मी आता किती आनंदी आहे, हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. 


'चानक मला ती मुलगी भेटली'


पुढे अब्दु म्हणाला की, 'मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी 20 वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी आणि आदर करणारी व्यक्ती असण्याचे मी किती स्वप्न पाहिले आहे. हे माझे स्वप्न होते आणि आता अचानक मला एक मुलगी भेटली आहे,  जी माझा आदर करते आणि माझ्यावर खूप प्रेम करते. मला आता माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत, कारण मी सध्या खूप उत्साहात आहे. 


अब्दूची होणारी बायको कोण?


असं म्हटलं जातंय की, अब्दू शारजाहच्या अमीराती तरुणीसोबत लग्न करणार आहे. त्यांचे लग्न UAE मध्ये होणार आहे. खलीज टाईम्सशी बोलताना तो म्हणाला, 'मी या प्रेमापेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणरा नाही.  मी माझ्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. अब्दू फेब्रुवारीमध्ये दुबई मॉलमधील सिप्रियानी डोल्सी येथे त्याच्या वधूला भेटला होता आणि तेव्हापासून त्यांच्या अफेरच्या चर्चा सुरु असल्याचं चित्र होतं. 






ही बातमी वाचा : 


Aastad Kale : निवडणुकांच्या धामधुमीत नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम, नाटाकाला फटका बसतोय का? आस्ताद काळे म्हणाला,'पुण्यातील दोन प्रयोग रद्द...'