एक्स्प्लोर

मी मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा, भोजपुरी अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना ओपन चॅलेंज

Bhojpuri Actor Dilesh Lal Yadav : मी मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा, असं म्हणत भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने ठाकरे बंधूंना ओपन चॅलेंज दिलं आहे.

Bhojpuri Actor Dilesh Lal Yadav : दोन दिवसापूर्वी उद्योजक सुशील केडिया या उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला खळखट्याकने प्रत्युत्तर दिल्यानंतर सुशील केडिया याने राज ठाकरेंची माफी मागितली. दरम्यान, सुशील केडियानंतर आता आणखी एका उत्तर भारतीयाने ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय.

 मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना चॅलेंज देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलवून दाखवा, असं म्हणत भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय. 

दिनेश लाल यादव काय काय म्हणाला?

दिनेश लाल यादव म्हणाला, "...अशा प्रकारची गोष्ट देशात कुठेही घडू नये. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो, आणि या विविधतेतूनही एकतेचं उदाहरण घालून देतो. गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांनी असं वागू नये, आणि त्यांनी स्वतःला सावरावं... मी मराठी बोलत नाही. मी उघड आव्हान देतो—तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा."

पुढे बोलताना यादव म्हणाला, हे तोडण्याचं राजकारण करु नका. जोडण्याचं राजकारण करा. तुम्ही घाण राजकारण करु नका. मी स्वत: एक राजकारणी देखील आहे. राजकारण लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे, असं मी मानतो. देशाच्या भल्यासाठी असली पाहिजे. कोणाची क्षमता असेल की, तो अनेक भाषा शिकू शकतो. तर त्याने शिकली पाहिजे. मराठी फार चांगली भाषा आहे. प्रेमळ भाषा आहे. भोजपुरी देखील प्रेमळ भाषा आहे. गुजराती आहे, मराठी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे.. प्रत्येक भाषेचं एक वेगळं सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सगळ्या भाषा शिकायला हव्यात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरची 'हिंदी वादावर' प्रतिक्रिया, म्हणाला; 'मी पहिल्यांदा भारतीय..'

भारतातील सर्वात महागडा सिनेमा, 1600 कोटींचं बजेट; रणबीर कपूर की यश कोणाचं मानधन जास्त?

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget