भारतातील सर्वात महागडा सिनेमा, 1600 कोटींचं बजेट; रणबीर कपूर की यश कोणाचं मानधन जास्त?
Ramayana Starcast Fees : नितेश तिवारी यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट रामायणम् सध्या चर्चेत आहे. रामायणम् हा सिनेमा 1600 कोटींच्या बजेटमध्ये बनवला जातोय.

Ramayana Starcast Fees : अनेक चित्रपट निर्मात्यांनी रामायणाच्या पौराणिक कथेला मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. काहीजण यशस्वी ठरले, तर काहीजण अयशस्वी. आता सध्या नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायणम्’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली आणि ती प्रेक्षकांना खूपच भावली. मात्र आता या चित्रपटाचा बजेट सर्वांनाच थक्क करणारं वाटत आहे.
‘रामायणम्’ हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. आधी सांगितले जात होते की या चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे 800 कोटी रुपये आहे. मात्र, एका ताज्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे एकूण बजेट तब्बल 1600 कोटी रुपये इतके आहे.
बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’च्या दोन भागांसाठी निर्मात्यांनी 1600 कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. त्यापैकी पहिला भाग 900 कोटी रुपयांच्या बजेटवर, तर दुसरा भाग 700 कोटी रुपयांवर बनवला जाणार आहे.
यासोबतच या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनासंदर्भात देखील अनेक माहिती समोर आली आहे. सांगितले जात आहे की, रणबीर कपूर या चित्रपटासाठी 75 कोटी रुपये मानधन घेत आहेत. म्हणजेच, दोन्ही भागांमधून त्यांचे एकूण उत्पन्न 150 कोटी रुपये होणार आहे. मात्र या आकड्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
चित्रपटात साई पल्लवी 'माता सीता'ची भूमिका साकारणार आहे. सियासत डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ती या भूमिकेसाठी 6 कोटी रुपये घेत आहे. त्यामुळे दोन्ही भागांमधून तिचे एकूण मानधन 12 कोटी रुपये होईल.
रणबीर कपूर नव्हे, तर केजीएफ स्टार यश हा 'रामायणम्'साठी सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार असल्याचे समजते. तो या चित्रपटात ‘रावण’ची भूमिका साकारतो आहे. ABP Liveच्या अहवालानुसार यश या दोन्ही भागांसाठी 200 कोटी रुपये मानधन घेत आहे. मात्र, याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता असेही मानले जात आहे की, त्याने 'राम'ऐवजी 'रावण'ची भूमिका स्वीकारण्यामागचे एक कारण म्हणजे त्याला मिळणारे अधिक मानधन असू शकते.
या चित्रपटात सनी देओल सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तो ‘रामायणम्’मध्ये भगवान हनुमानच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या मानधनाविषयी माहिती जाहीर झालेली नाही. मात्र, तो या चित्रपटाचा भाग होऊन "सन्मानित" वाटत असल्याचे सांगतो आहे, कारण हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील कथा मांडतो.
'रामायणम्'मध्ये रवि दुबे, कुणाल कपूर, लारा दत्ता यांच्यासारखे इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
29 वर्षीय अभिनेत्याचा 53 वर्षीय तब्बूसोबत किसिंग सीन, नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज तुफान चर्चेत























