(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharti Singh : 'जुळी मुलं होणार?'; भारती सिंहच्या उत्तरानं वेधलं लक्ष
एका मुलाखतीमध्ये भारतीला जुळ्या मुलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला भारतीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. छोट्या पडद्यावरील वेगवगेगळ्या कार्यक्रांमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे आई- बाबा होणार आहेत. एका मुलाखतीमध्ये भारतीला जुळ्या मुलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला भारतीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
भारतीनं एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, 'तुला जुळी मुलं होणार आहेत का?' या प्रश्नाला भारतीनं उत्तर दिलं, 'मला एकचं मुल होणार आहे. फक्त हे नाही माहित की मुलगा होणार आहे की मुलगी. हर्षला लहान मुलं खूप आवडतात. आम्ही दोघेही खूप एक्सायटेड आहोत.'
View this post on Instagram
भारती आणि हर्ष हे सध्या 'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचे परिणिती चोप्रा, करण जोहर आणि मिथून चक्रवर्ती हे परिक्षण करतात. तसेच भारती लवकरच खतरा खतरा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये फराह खान देखील सहभागी होणार आहे.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 6 : ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
- Nana Patekar : ‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा, त्यातून तेढ निर्माण करू नये!’, ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha