Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
Beed Files First Poster Out: 'बीड फाईल्स' या आगामी मराठी थ्रिलरचा पहिला पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे.

Beed Files First Poster: बॉलिवूडमध्ये 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. आता मराठी सिनेसृ्ष्टीत 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (The Maharashtra Epstien Files) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी थरारक प्रकरणामुळे बीड जिल्हा हा गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनलं असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या दाहक वास्तवावर आधारीत 'बीड फाईल्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'बीड फाईल्स' या सिनेमाचा नवा कोरा पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरची विशेष चर्चा होत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'बीड फाईल्स' सिनेमाचा बहुप्रतिक्षित पोस्टर रिलीज (Beed Files First Poster Out Marathi Film)
'बीड फाईल्स' हा सिनेमा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा - सु्व्यवस्थेच्या दाहक वास्तवावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केले असून, डॉ. डोईफोडे फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संवेदनशील विषयावर आधारीत या सिनेमात नेमकी कोणती कथा दाखवण्यात येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'बीड फाईल्स' या सिनेमाचे निर्माते डॉ. शशिकांत डोईफोडे असून, सह - निर्माता शिवराज बांगर आहेत. 'बीड फाईल्स' या सिनेमाच्या पोस्टरवर पोलिसांची जीप दिसत आहे. पवनचक्की असणाऱ्या जागेवर काही पोलीस दिसत आहेत. तर, एक व्यक्ती पोलिसांकडे बघत उभा असल्याचं पोस्टरमध्ये दिसत आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. 'रोखून धरा श्वास... तो येतोय. बीडच्या वास्तवावर आधारीत थरारक चित्रपट लवकरच येतोय', असं लिहिलेलं आहे. दरम्यान, समाजातील वास्तववादी प्रश्न आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या या सिनेमता नेमकी कोणती कथा दाखवण्यात येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. बीडच्या रक्तरंजित प्रकरणावर आधारीत हा सिनेमा असणार अशी माहिती आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार? या सिनेमातून कोणती स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.























