एक्स्प्लोर

Netflix : नेटफ्लिक्सला मोठा झटका; 'या' चित्रपटामुळे 150 कोटीचं नुकसान

Netflix : या बिग बजेट चित्रपटामुळे नेटफ्लिक्स मोठ नुकसान झालं आहे. 

Netflix : एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाहुबली' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रभासला 'बाहुबली' या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. नेटफ्लिक्सनं बाहुबली चित्रपटाचा प्रीक्वेल म्हणजेच  Baahubali: Before The Beginning या चित्रपटाची घोषणा केली होती. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे नेटफ्लिक्स मोठ नुकसान झालं आहे. 

रिपोर्टनुसार,  बाहुबली चित्रपटाच्या  प्रीक्वेलमध्ये चित्रपट निर्माते हे बाहुबलीची आई शिवगामीची गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडणार होते. या चित्रपटामधील प्रमुख भूमिका अभिनेत्री  मृणाल ठाकुर साकारणार होती. मृणाल ठाकूरसोबतच वामिका गब्बी आणि  दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा हे देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव कट्टा हे करणार होते पण हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही. 

बाहुबली चित्रपटाचा प्रीक्वेल प्रदर्शित होणार नसल्यानं नेटफ्लिक्सचं 150 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. कारण या चित्रपटाचं काम हे सहा महिने सुरू होतं. या चित्रपटाचे अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्यानं  निर्मात्यांना या चित्रपटाचा प्रीक्वल मध्येच थांबवणे योग्य वाटले. 

2015 मध्ये रिलीज झालेल्या बाहुबली चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज या  कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. बाहुबली चित्रपटाचा 39 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील प्रीमियर झाला आणि या चित्रपटानं तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकले आहेत.

हे देखील वाचा-

Zombivali : 'झोंबिवली' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, राज्यभरातील सिनेमागृहात बुधवारी होणार प्रदर्शित

Deepika Padukone, Ranveer Singh : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका अन् रणवीरची पहिली भेट; अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी

Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget