Avneet Kaur :  कमी वयात कान्स सोहळ्याला हजेरी लावणारी अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ही सध्या बरीच चर्चेत आहे. त्यातच तिने नुकतच केलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ माजली आहे. अवनीत कौरने 2012 मध्ये मेरी माँ या मालिकेतून तिच्या सिनेसृष्टीतील प्रवसाला सुरुवात केली होती. पण आत तिने तिच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली का असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून विचारण्यात येतोय. 

 

अवनीत कौर ही 2010 मध्ये  ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिने तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. अवघ्या 22 वर्षांची असलेल्य या अवनीतने तिच्या सोशल मीडियावर 28 मे रोजी काही फोटो शेअर केले आहेत. त्यावरुन तिने साखरपुडा केला असल्यचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. पण यावर अवनीतने अद्याप कोणत्याही प्रकारचं भाष्य केलंलं नाही. 

सोशल मीडियावर चर्चांना उधाण 


अवनीतने ते फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदनही केलं आहे. त्याचप्रमाणे काही जणांनी तिला तिच्या साखरपुड्याविषयी देखील प्रश्न विचारले आहेत. एका युजरने तिला तिचा साखरपुडा झाला आहे का असा प्रश्न देखील विचारला आहे. तसेच अनेकांनी तिने साखरपुडा केला असून कोणाबरोबर साखरपुडा केला कधी केला असे अनेक प्रश्न पडले आहेत. पण काहींचं म्हणणं आहे की, अवनीतचं हा एक पीआर स्ंटट आहे. तिने कोणत्यातरी ब्रँडची जाहिरात करण्यासाठी हे फोटो शेअर केले आहेत. पण सध्या रिपोर्ट्सनुसार, ही अभिनेत्री निर्माता राघव शर्माला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच अवनीतने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळेही चर्चांना आणखी जोर आला. यावर अवनीतने म्हटलं की, चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतोच.






कमी वयात कान्समध्ये पोहचणारी पहिली भारतीय अभिनेत्री 


अवनीतने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणारी कमी वयातील ती पहिली अभिनेत्री ठरली आहे. कान्समध्ये अवनीतच्या  Love In Vietnam या आंतरराष्ट्रीय सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. भारत आणि वियेतनामच्या सहयोगाने बनवण्यात आलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात शांतनु माहेश्वरी देखील झळकणार आहे. 

ही बातमी वाचा : 


Salman Khan : 'ऐश्वर्यासोबत काम करु नको', अभिषेकला सलमाननेच दिली होती धमकी; नेमकं काय घडलं होतं?