पुणे : दहावीची परिक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट असतो. दहावीत उत्तम मार्क मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. मात्र यंदा दहावीचा निकाल लागला आणि 100 टक्के मिळवणाऱ्यापेक्षा 35 टक्के मिळवणाऱ्या पठ्यांचींच जास्त चर्चा रंगली. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना कमी जास्त नाही तर प्रत्येक विषयात 35 मार्क  मिळाले आहेत आणि या विद्यार्थ्यांची चांगलीत मिरवणूक किंवा सत्कार केला जात आहे. त्यातच पुण्यातील प्रथमेश तूपसौदर नावाच्या मुलाने आणि जालन्यातील साईप्रसाद खेडकरने दहावीत थेट 35 टक्के मार्क पाडले दोघेही एवढ्यावरच थांबले नाही तर या पठ्यांनी आपल्याला मिळालेल्या यशाचं म्हणजेच निदान काठावर पास झाल्याचं सेलेब्रेशनदेखील केलं. 


प्रथमेश हा पुण्यातील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश शाळेत शिकत होता. मात्र वर्षभऱ फार कमी दिवस शाळेत गेला. एबीपी माझाशी बोलताना त्याने किमान पास झाल्याचा आनंद व्यक्त केला. मी शाळेतच जात नव्हतो. आई वडिलओरडायचे पण घरातून निघून गावात फिरत बसायचो. पेपरच्या एकदिवसाआधी जेवढा अभ्यास केला. त्यावरच पास झालो. अभ्यासच केला नाही त्यामुळे सगळेच पेपर सोपे वाटले असं म्हणत तोच हसला. आई घरकाम करते आणि वडिल रिक्षा चालवायचे पण आता ते महापालिकेत नोकरी करणार आहे. आता मला यातून धडा मिळाला आणि आता मी पण चांगला अभ्यास कऱणार आहे, असंही त्याने सांगितलं. शिवाय मित्रांनी 35 टक्के मिळाले म्हणून जल्लोष साजरा केला. आई वडिल थोडे ओरडले पण नंतर त्यांनीदेखील आनंद साजरा केला, असंही तो म्हणाला. 


प्रथमेश बरोबरच जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावच्या साईप्रसाद खेडकर या मुलाने दहावी परीक्षेत सर्वच विषयात 35-35 गुण मिळवून आगळा वेगळा विक्रम केलाय, त्याच्या या यशाचं गावात कौतुक होत असून मित्रांनी त्याच्या निकालाचा  केक कापून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,तर कुटुंबातील सदस्य देखील तो पास झाल्यान आनंदित आहेत. साईप्रसादने आपण चांगला अभ्यास केला,यापुढे आपण तांत्रिक कौशल्य शिकण्यासाठी आयटीआय करणार असल्याच त्याने म्हटलंय.त्याच्या या यशाने त्याचे वडील आणि संपूर्ण परिवार खुश झाल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिलीय,विशेष म्हणजे त्याच्या आजीने आनंदित होऊन त्याला मोबाईलदेखील गिफ्ट दिलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Porsche Car Accident : ड्रायव्हरला डांबून नेणारी मर्सिडीज जप्त; अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणी वाढणार


Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना