Hardik Pandya Natasa Stankovic Engagement: हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनं सध्या जोर धरला आहे. सोशल मीडियावर घटस्फोटची जोरदार चर्चा होत आहे. हार्दिक अथवा नताशा यांच्याकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण अफवांचा बाजार उठला आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहे. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमधून हार्दिक पांड्याचं नाव आणि फोटो हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चेला वेग आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या साखरपुड्याबाबातची नवी माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्याने नताशाला प्रपोज करण्याआधी कुटुंबियांनाही सांगितलं नव्हतं. 


हार्दिक पांड्याने 2020 मध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशाला प्रपोज केले होते. त्यानं काही फोटोज शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर काही महिन्यातच नताशानं मुलाला जन्म दिला होता.  







कुटुंबाला काहीच सांगितले नाही 


2020 मध्ये हर्षा भोगले याच्या एका शे दरम्यान हार्दिक पांड्याने आपल्या साखरपुड्याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी हार्दिक म्हणाला होता की, मी कुटुंबाला न सांगता, चर्चा न करता नताशाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. मी साखरपुडा करणार होतो, हे माझ्या कुटुंबालाही माहिती नव्हते. दोन दिवस आधी मी कृणालला सांगितलं होतं. त्यानं मला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. 


हार्दिक पांड्याबाबत नताशाला काहीच माहिती नव्हते ?


हार्दिक पांड्याने तेव्हा सांगितले की, नताशाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी प्रसिद्ध खेळाडू नव्हतो. पहिल्यांदा नताशाला भेटलो त्यावेळी रात्रीचे एक वाजले होते. त्यावेळी मी टोपी, चेन घड्याळ घातलेले होते. हे पाहिल्यानंतर नताशाला वेगळा वाटलो असेल. त्यांतर आमच्यामध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी लग्न साखरपुडा केला. 


हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी मे 2020 मध्ये लग्न केलं होतं. ते दोघे मुंबईत एका पार्टीत भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता नताशा स्टॅनकोविकनं तिच्या आडनावातून पांड्या हटवल्यानं घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.


हार्दिक पांड्याची 70 टक्के प्रॉपर्टी जाणार ?


हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या  चर्चा सुरु असतानाच आणखी एका चर्चेला उधाण आलेय. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आपल्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागेल, या चर्चेला वेग आलाय. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.