Salman Khan : बॉलीवूडमध्ये अनेक लव्हस्टोरीज् आहेत, त्यातल्या काही लव्ह स्टोरीज् या पूर्णत्वाला गेल्या, तर काही लव्ह स्टोरीचा अत्यंत वाईट असा शेवट झाला. त्यातील एक लव्ह स्टोरी म्हणजे सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या दोघांची. खरंतर, एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात खूप प्रेम होतं. पण नंतर परिस्थिती बदलली आणि दोघेही वेगळे झाले.असं म्हटलं जातं की, ब्रेकअपनंतर सलमानने ऐश्वर्याला फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. तो तिला चित्रपटात कास्ट करू नये म्हणून निर्मात्यांवर दबाव टाकायचा.
सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात इतका वेडा होता की, सलमानने अभिषेकला ऐश्वर्यसोबत काम न करण्याची धमकी देखील दिली होती असं सांगण्यात येतं. सलमान आणि ऐश्वर्याची जोडी ही तेव्हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी होती. अनेकांच्या पसंतीस हे जोडपं उतरलं होतं. पण त्यांच्यात खटके उडाले आणि त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्नगाठ बांधली पण सलमान अद्यापही सिंगल आहे.
सलमानने अभिषेकला का धमकावलं होतं?
ब्रेकअपनंतर सलमान खान ज्या ऐश्वर्याला तिचं करिअर घडवण्यासाठी निर्मात्यांची शिफारस करत असे त्याच ऐश्वर्याला त्याच्यामुळे अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आल्याचंही सांगितलं जातं. शाहरुख खानच्या 'चलते चलते' या चित्रपटात सुरुवातीला ऐश्वर्याला कास्ट करण्यात आले होते. पण नंतर तिच्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आल्याचं म्हटलं जातं. सलमानसोबतच्या ब्रेकअपमुळे ऐश्वर्याला अनेक चित्रपट गमवावे लागले होते.
त्याचवेळी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आपल्या करिअरसाठी प्रयत्न करत होता. त्याला एक ऑफर आली ज्यामध्ये ऐश्वर्या रायलाही काम मिळाले होते. अभिषेकने त्या प्रोजेक्टला होकारही दिला होता. पण त्यावेळी सलमानने अभिषेकला ऐश्वर्यासोबत काम न करण्याची धमकी दिली होती. त्यावर अभिषेकने त्याला स्पष्ट नकार दिला होती. रिपोर्ट्सनुसार, यावर सलमान खान इतका संतापला की त्याने अभिषेकच्या कारची तोडफोडही केली.पण अभिषेक आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि नंतर ऐश्वर्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
मैत्री, प्रेम ते लग्न...
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नबंधनात अडकले. न्यूयॉर्क येथील हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं, असं म्हटलं जात होतं. आता ऐश्वर्या-अभिषेकच्या एका पोस्टमुळे त्यांच्यात सारं काही आलबेल असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात घटस्फोट होऊ नये, असं चाहते म्हणत आहेत. अभिषेक-ऐश्वर्या 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्याने एका झाडाला सात फेरे घेतल्याचं म्हटलं जात आहे.