एक्स्प्लोर

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक

Atul Gogavales Son Makes Debut in Chhatrapati Song: 'राजा शिवाजी' चित्रपटातील अँथम साँग रिलीज. आर्य गोगावलेची पहिली झलक पाहून प्रेक्षक खूश.

Atul Gogavale Son Arya Gogavale Debut In Marathi Film: अजय - अतुल (Ajay Atul).  या जोडीनं केवळ मराठीच नसून, हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताचा डंका गाजवला. त्यांनी आपली कला सातासमुद्रापार नेली.  अजय - अतुल यांच्या केवळ गायनाने नाही तर संगीतानेही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या संगीताने भारतीय सिनेसृष्टीला अक्षरश: वेड लावलं. दरम्यान, या जोडीने पुन्हा एकदा रितेश देशमुख याच्या बहु्प्रतिक्षित 'राजा शिवाजी' या सिनेमाला संगीत  देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.  या सिनेमातील अँथम साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील  कलाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या गाण्यात एका खास गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाचं अँथम साँग प्रदर्शित झालं आहे. 'छत्रपती' असे गाण्याचे नाव आहे. या खास गाण्यात सिद्धार्थ जाधव यांसह अनेक दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळाली.  दरम्यान, या गाण्यात गायक अतुल गोगावले  यांच्या मुलाचीही पहिली झलक पाहायला मिळाली आहे.  अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

अतुल गोगावलेंचा मुलगा झळकला 'राजा शिवाजी' चित्रपटात(Atul Gogavales Son Makes Debut in Chhatrapati Song)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Atul Gogavale (@atul.ajayatul)

गोगावले घराण्याचा वारसा आता संगीतापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढीने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'छत्रपती' या गाण्यात अतुल गोगावलेंचा मुलगा आर्यला पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय.   अतुल गोगावलेंनी याची पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे.  या पोस्टवर कमेंट करुन सिनेसृ्ष्टीतील कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. अतुल गोगावलेंच्या पोस्टवर मुलगा आर्य गोगावलेने 'लव्ह यू पप्पा' अशी कमेंट केली आहे.  सध्या अतुल गोगावलेंची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'छत्रपती' हे गाणं रेमो डिसूझाने कोरिओग्राफ केलं आहे. या गाण्यातून कलाकारांची एक वेगळीच ऊर्जा  आणि उत्साह पाहायला मिळत आहे.  या गाण्यात शेकडो कलाकारही दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक तसेच नेटकऱ्यांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे. 

रितेश देशमुखचा बहुचर्चित 'राजा शिवाजी' हा चित्रपट महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानंच केलं आहे. या सिनेमात तगड्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  रितेश देशमुख व्यतिरिक्त या ऐतिहासिक सिनेमात जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी यांच्याही  महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा अनुभवता येणार, यात शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
Dhamaal 4 Box Office Collection'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Embed widget