एक्स्प्लोर

Asha Bhosle Death: 'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO

Asha Bhosle Death: आशाताईंच्या जाण्यानं देशभरात शोककळा पसरली आहे. अशातच एका मुलाखतीत आशा भोसले यांनी इंडस्ट्री काम मिळत नसल्याचं सारखं रडगाणं म्हणून दाखवणाऱ्यांना तिखट शब्दांत उत्तर दिलंय. 

Asha Bhosle Death: दिग्गज गायिका आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांच्या निधनानंतर, त्यांच्या अनेक जुन्या मुलाखती आणि वक्तव्य पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. आशा भोसले यांनी गाणी गाताना अनेक प्रयोग केले, त्यामुळे इंडस्ट्रीतल्या वर्सटाइल सिंगर (Versatile Playback Singer) म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या जाण्यानं देशभरात शोककळा पसरली आहे. अशातच एका मुलाखतीत आशा भोसले (Asha Bhosle) यांनी इंडस्ट्री काम मिळत नसल्याचं सारखं रडगाणं म्हणून दाखवणाऱ्यांना तिखट शब्दांत उत्तर दिलंय. 

आशा भोसले यांचं रोखठोक उत्तर (Asha Bhosle Statement On Other Singers)

दिग्गज गायिका आशा भोसले म्हणाल्या की, "ज्याला आपल्या कलेचं खरं ज्ञान असतं, अशी कोणतीही व्यक्ती कधीच अशी तक्रार करत नाही की, कोणीतरी आपल्याला गाण्यापासून रोखतंय किंवा आपल्या कामात अडथळा निर्माण करतायत... ज्यांच्याकडे कौशल्य असतं, त्यांच्याकडे आत्मविश्वासही असतोच... तुम्ही कधी असं ऐकलंय का? किंवा कोणत्याही वर्तमानपत्रात वाचलंय का? की, लता किंवा आशा यांनी अशी तक्रार केलीय की, कोणीही त्यांना गाण्याच्या संधी देत ​​नाहीय? तुम्हाला असं वाटतं का की, आम्हाला संघर्षाचा सामना करावा लागला नाही किंवा आम्ही कठोर परिश्रम केले नाहीत? आम्ही अत्यंत कठोर परिश्रम केलेत, तरीही आम्ही कधीच अशी तक्रार केलेली नाही की, कोणीही आम्हाला गाण्याची परवानगी देत ​​नाहीय किंवा काम देत नाहीय. गोष्टी तशा चालतच नाहीत. हिरा हा शेवटी चमकणारच असतो... त्याचप्रमाणे, जर आपल्याकडे गुणवत्ता असेल, तर आपल्याला काम नक्कीच मिळेल..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Femina (@feminaindia)

आशाताई पुढे बोलताना म्हणाल्यात की, "जर मी तुम्हाला सांगितलं की, उद्या जेवण करू नका, तर तुम्ही खरोखरंच जेवण करणं टाळाल का? तुम्हाला असं वाटतं का की, केवळ आम्ही असं सांगितलं म्हणून, एखादा संगीत दिग्दर्शक इतर गायकांना गाणी देण्यास नकार देईल? अर्थातच ते त्यांना काम देतील, हे 'शो बिझनेस'चं जग आहे आणि यात सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या प्रयत्नात असते. जर त्यांना काहीतरी ताजं आणि नाविन्यपूर्ण गवसलं, तर ते क्षणाचाही विलंब न करता त्या गायकांना काम देतात..."

सूरांचा वारसा लाभूनही आशाताईंनी इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केलं

आशा भोसले यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि अथक परिश्रम घेतले. त्यांनी अगदी लहान वयातच गायनाला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात, प्रस्थापित गायकांनी नाकारलेली गाणीच त्यांना गाण्यासाठी दिली जात असतं. मात्र, त्यांनी याच गाण्यांचं रूपांतर आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यात केलं. हळूहळू, सिनेमांची गाणी, गझल, पॉप आणि शास्त्रीय संगीत अशा संगीताच्या प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या परिस्थितीबद्दल कधीच तक्रार केली नाही. उलट, त्यांनी आपल्या कामालाच स्वतःबद्दल बोलू दिलं. त्यांच्या निधनानंतर, समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांना  श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asha Bhosle On Marry Helen: 'जर ती मुलगा असती, मी तिच्यासोबत पळून गेले असते...', दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होत्या आशा भोसले, 'ती' दिसली की, एकटक पाहतच राहायच्या

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget