Asha Bhosle On Marry Helen: 'जर ती मुलगा असती, मी तिच्यासोबत पळून गेले असते...', दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होत्या आशा भोसले, 'ती' दिसली की, एकटक पाहतच राहायच्या
Asha Bhosle On Marry Helen: आशा भोसले यांच्या जाण्यानं त्यांची अत्यंत जवळची मैत्रीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी शोक व्यक्त केलाय.

Asha Bhosle On Marry Helen: संगीत विश्वातील एक अजोड व्यक्तीमत्व, सूरसम्राज्ञी आणि दिग्गज गायिका आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेस्ट इन्फेक्शन आणि अशक्तपणा यामुळे 11 एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे (Multiple Organ Failure) त्यांचं निधन झालं. अगदी थोरामोठ्यांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनाच आपल्या गाण्यांनी भूरळ घालणाऱ्या आशाताईंच्या जाण्यानं अख्खा देश शोकसागरात बुडाला. अनेकांनी आशाताईंच्या जाण्यावर शोक व्यक्त केलाय. अशातच आशा भोसले यांची अत्यंत जवळची मैत्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन (Veteran Actress Helen) यांनीही सूरसम्राज्ञीच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
आशा भोसले यांच्या निधनाबद्दल हेलन यांनी व्यक्त केला शोक (Helen Expressed Condolences To Asha Bhosle)
HT ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्गज अभिनेत्री हेलन यांनी शोक व्यक्त केलाय. त्या म्हणाल्या की, ही बातमी त्यांच्यासाठी एक मोठा धक्काच ठरली आहे. त्यांनी सांगितलं की, त्या आशाजींच्या संपर्कात होत्या आणि आशाजींची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं त्यांना वाटत होतं, त्यामुळेच, त्यांच्या निधनाच्या या बातमीवर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जातंय.
आपल्या घट्ट मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना हेलन म्हणाल्या की, आशा भोसले यांनी आपल्या आवाजात जी विलक्षण जादू आणि ऊर्जा भरली होती, नेमक्या त्याच गोष्टींमुळे त्यांची गाणी इतकी असाधारण बनली होती. त्यांनी नमूद केलं की, आज त्यांनी एक अमूल्य रत्न गमावलंय.

"आशाजी म्हणायच्या, जर ती मुलगा असती, मी तिच्यासोबतच पळून गेले असते..."
एका जुन्या मुलाखतीत आशा भोसले यांनी हेलन यांचा आपली आवडती अभिनेत्री म्हणून उल्लेख केलेला. आशाताई म्हणालेली की, हेलन एवढी सुंदर होती की, जेव्हा ती खोलीत यायची, तेव्ही मी गाणं सोडून तिच्याकडे पाहत बसायची, आणि गंमतीनं असंही म्हणायचे की, जर ती (हेलेन) मुलगा असती तर, मी तिच्यासोबत पळून गेले असते..."
हेलन आणि आशाजी आयकॉनिक जोडी (Helen And Asha Bhosle Iconic Duo)
दिग्गज अभिनेत्री हेलन आणि महान गायिका आशा भोसले यांनी हिंदी सिनेमामध्ये एक आयकॉनिक सिंग-परफॉर्मर जोडी बनवलेली. दोघींनी एकत्र 270 हून अधिक गाण्यांमध्ये काम केलं. ज्यानं त्यावेळच्या ग्लॅमर आणि म्युझिकला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
'ओ हसीना जुल्फोंवाली' (तीसरी मंज़िल, 1966), 'आ जा ने जान' (इंतकाम, 1969), 'पिया तू अब तो आजा' (कारवां, 1971), 'महबूबा महबूबा' (शोले, 1975) आणि 'ये मेरा दिल' (डॉन, 1978) यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी या जोडीला अजरामर केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















