मुंबई: 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक' च्या पहिल्या दिवशी अभिनेत्री हेलन आणि अभिनेता अरबाज खान यांनी रॅम्प वॉक केला. हेलन या 82 वर्षाच्या आहेत. पण जेव्हा त्यांनी या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करायला सुरूवात केली तेव्हा त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जेव्हा हेलन यांनी रॅम्प वॉक करायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाने आणि हटके अंदाजाने उपस्थित असणाऱ्या सर्वांना आश्चर्यचकित केले. हेलनसोबत आरबाजने देखील रॅम्प वॉक केला. यावेळी हेलन यांनी डिझाइनर शाइना एन. सी यांनी डिझाइन केलेली काळ्या रंगाची साडी नेसली होती. काळ्या रंगाची साडी आणि सोनेरी रंगाची ज्वेलरी असा रॉयल लूक हेलन यांनी केला होता.  रॅम्प वॉक करताना हेलन यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. 


Little Things Season 4 Review : आजच्या काळात लिव-इनचा झाला अंत, ध्रुव आणि काव्याचे प्रेम झाले सफल


अरबाजने हेलन यांच्या काळ्या साडीला मॅच करणारी काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. रॅम्प वॉक करताना हेलन यांच्या एकाबाजूला आरबाज तर दुसऱ्या बाजूला डिजाइनर शाइना एन. सी या होत्या. वॉक झाल्यानंतर   हेलन यांनी मीडियासोबत संवाद साधला. अरबाज आणि हेलन यांच्या बरोबरच 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक' च्या पहिल्या दिवशी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने देखील वॉक केला. या फॅशन वीकसाठी तिने  डिजाइनर सोनाक्षी राज यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. तिने यावेळी डान्स देखील केला. 


काही दिवसांपूर्वी रकुलप्रीतने प्रसिद्ध निर्माता जॅकी भगनानीसोबतच्या नात्याचा खुलासा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केला होता. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. रॅम्प वॉक झाल्यानंतर रकुलप्रीतने देखील मीडियासोबत संवाद साधला. 


Akshay Kumar Upcoming Film : Akshay Kumar कडून आगामी 'गोरखा' सिनेमाचं पोस्टर रिलीज; पहिला लूक जबरदस्त


Sooryavanshi Release Date : 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रतिक्षा संपली, Akshay Kumar ने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती