Anupam Kher : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर मनोरंजक व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका कुटुंबाचा आहे, ज्यांच्यासोबत अनुमाप खेर यांनी ट्रॅफिक सिग्नल दरम्यान गप्पा मारल्या आहेत. प्रवास करत असताना रस्त्यात त्यांची एका कुटुंबाशी भेट झाली, जी अनुपम खेर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.


यावेळी हे कुटुंब स्कूटरवर होते. नवरा-बायकोसोबत दोन मुलंही होती. तर, अनुपम खेर त्यांच्या कारमध्ये होते. अनुपम खेर यांनी व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्यांना या कुटुंबाला भेटायला खूप आवडले. तर, त्यांना भेटून कुटुंबालाही आनंद झाला असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


पाहा व्हिडीओ :



अनुपम खेर कारने जात असताना या वाहतूक कोंडीदरम्यान त्यांनी एका कुटुंबाशी संवाद साधला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनुपम खेर यांना कारमध्ये बसलेले पाहून पती पत्नीला बोलतो, ‘ते अनुपम खेर आहेत बघ..’ तोपर्यंत अनुपम खेर गाडीची खिडकी खाली करून त्यांना विचारतात, ‘कसे आहात?’ स्कूटी चालवणारा माणूस उत्तर देतो की, सर्व काही ठीक आहे. तसेच, मोबाईल घेऊन सेल्फी काढतो. त्या व्यक्तीची पत्नी अनुपम खेर यांना ईदच्या शुभेच्छा देते. अनुपम खेर देखील त्यांना शुभेच्छा देतात.


300 कोटींच्या चित्रपटांची चर्चा


अभिनेते अनुपम खेर यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनुपम खेर नुकतेच अनिल कपूर यांच्यासोबत ‘RRR’ हा चित्रपट पाहायला गेले होते. यादरम्यान, ते म्हणाले की, त्यांच्या आणि एसएस राजामौलीमध्ये एक गोष्ट समान आहे की, दोघांचेही चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. यावर विनोद करत अनिल कपूर देखील त्यांना म्हणाले की, मला ही आशीर्वाद द्या, माझेही चित्रपट 300 कोटी कमवू देत.


 हेही वाचा :


Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...


PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!


Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल