PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!
Tejaswwi Prakash
1/7
आता ‘लॉक अप’ या शोमध्ये करण कुंद्रासोबत त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) देखील ‘वॉर्डन’च्या भूमिकेत दिसणार आहे.
2/7
बॉलिवूड ‘पंगा क्वीन’ कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) आता अंतिम टप्प्यात आहे. या शोमध्ये स्पर्धक एकापाठोपाठ एक आपली गुपित उघड करत आहेत.
3/7
image 2तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) देखील ‘वॉर्डन’च्या भूमिकेत दिसणार आहे. ALTBalaji ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याची घोषणा केली आहे.
4/7
शुक्रवारी प्रसारित झालेल्या शोच्या विशेष भागाचा टीझर बुधवारी ALTBalaji ने शेअर केला. या शोमध्ये तेजस्वी लॉक अपमध्ये पेअवेश करताना दाखवण्यात आली आहे.
5/7
करण कुंद्राने मार्चमध्ये जेलरच्या भूमिकेत या शोमध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये तो स्पर्धकांना अनेक टास्क करायला लावतो आणि त्यांच्याकडून आणखी काही चूक झाली, तर स्पर्धकाची चांगली शाळाही घेतो.
6/7
करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत.
7/7
‘लॉक अप’ हा कैद्यांवर आधारित शो आहे. या शोमध्ये कंगनाच्या तुरुंगात सेलिब्रिटी स्पर्धक लॉक झालेले दिसत आहेत. या कारागृहात कैद्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी कामे करावी लागत होती. शोचा ग्रँड फिनाले या शनिवारी म्हणजेच 7 मे रोजी होणार आहे आणि यासोबतच शोचा पहिला सीझनही संपणार आहे.
Published at : 05 May 2022 08:04 AM (IST)