Jayeshbhai Jordaar Controversy : अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) रिलीजपूर्वीच अडचणीत सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्याबाबत बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रेलरच्या एका सीनमध्ये प्रसूतीपूर्व लिंग निर्धारणासाठी अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'युथ अगेन्स्ट क्राइम' नावाच्या एनजीओने ही याचिका दाखल केली आहे.


चित्रपटासंबंधित हे प्रकरण (पीआयएल) कार्यवाहक मुख्य न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आले होते. अधिवक्ता पवन प्रकाश पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट स्त्री भ्रूणहत्येच्या विषयावर आधारित असून, 'मुलगी वाचवा' या मोहिमेवर भर दिला आहे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रसुतिपूर्व लिंग निदान स्क्रिनिंगचा एक सीन दाखवण्यात आला आहे.


‘तो’ सीन वगळण्याची मागणी


इतकंच नाही तर, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाच्या वापराची जाहिरात करण्यात आली आहे, जी योग्य नाही. गर्भधारणा आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा, 1994 अंतर्गत हे बेकायदेशीर आहे. भारतातील स्त्री भ्रूणहत्या आणि घटते लिंग गुणोत्तर रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार प्री-नॅटल लिंग स्क्रीनिंगला बंदी आहे. त्यामुळे चित्रपटातून हे दृश्य वगळले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


रणवीर सिंहची हटके भूमिका


या चित्रपटात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, जो आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करतो आणि बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जेव्हा या चित्रपटाच्या कथेची कल्पना सर्वांसमोर आली, तेव्हा लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. रणवीर सिंहच्या व्यक्तिरेखेचे ​​लोकांकडून खूप कौतुक केले गेले.


मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे देखील आहे, जी या चित्रपटातून रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट दिव्यांग ठक्करने दिग्दर्शित केला असून, 13 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :


Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला


Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर


Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती