Ajit Pawar : मागच्या काही दिवसात अल्टिमेटम देण्यात येत होता, तशी चर्चा होती. पण आम्ही सांगत होतो अशी भाषा करु नका. कारण सरकार हे अल्टिमेटमरवर नाही तर कायद्यानं चालतं असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. जो काही निर्णय करायचा तो सर्वांना बंधनकारक असणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे लावता येणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले.

Continues below advertisement


भोंग्याबाबत परवानगी न घेणाऱ्यांवर कारवाई करणार


कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही सर्वांना नियम सारखे राहतील असेही अजित पवार यावेळी म्हणाले. जे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर्वांना आवाहन करतो की, जी काही धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी परवानग्या घ्याव्यात. लाउडस्पीकरचा वापरा करताना मर्यादा पाळा. कोर्टाने जे नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करा असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, जे कोणी परवानगी घेणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल असा इशाराही अजित पवार यांनी केला. इथे काही हुकुमशाही नाही, कोणाही अल्टिमेटम देऊ नये. कायद्याने सर्व काही चालते. नियम सर्वांना सारखे असले पाहिजेत असेही पावर म्हणाले. उत्तर प्रदेशमधील जहागीरपूरमध्ये दिल्ली येथील दंगलीनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या आश्रमावरील भोंगा उतरवला. त्यानंतर त्यांनी भोंगे काढण्याचे आवाहन देखील केल्याचे अजित पवार म्हणाले.


जे कोणी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करत होते, त्यांच्यावर कारवाई केली आहे, अनेकांना नोटीस दिल्या आहेत. मशीदिंनी आवाजाची मर्यादा ठेऊन सहकार्य केलं पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. सर्वांनाच याची अंबलबजावणी करावी लागणार आहे. मी आवाहन करतो की आपल्या राज्यात जितकी धार्मिक स्थळे आहेत त्यांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. जे परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अजित पवार म्हणाले.


ओबीसींनी आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न केले. पण चांगले झाले तर सगळ्यांनी केलं, योग्य नाही झालं तर सरकारने केले असे विरोधक म्हणत असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधकांना घेऊन आम्ही सगळे निर्णय घेतले आहेत. शेवटपर्यंत आम्ही ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. आज आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. निवडणुका कधी घ्यायच्या यावर देखील चर्चा होईल असेही अजित पवार यांनी सांगितेल.