Ankita Lokhande and Vicky Jain invite Bhagat Singh Khoshyari to their wedding : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि  विकी जैन हे (Vicky Jain)  लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याच्या आधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अंकिताने नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. विकी आणि अंकिताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

  


भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीचे फोटो शेअर करून अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आज महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांना भेटण्याची संधी मिळाली. भगतसिंह जी तुम्ही खूप व्यस्त असता हे मला माहित. वेळ काढून आम्हाला भेटल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. ' फोटोमध्ये अंकिता आणि विकी त्यांची लग्नपत्रिका भगत सिंह कोश्यारी यांना देताना दिसत आहेत. 






मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकिता 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धा आर्याने  विकी आणि अंकिताच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे.  लग्नसोहळा 12,13,14 डिसेंबरला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, अशी चर्चा आहे.  काही दिवसांपूर्वी अंकिताने  'ब्राइड टू बी' असं लिहिलेल्या तिच्या फूटवेअरचा फोटो शेअर केला होता.


अंकिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अंकिता विकीसोबतचे फोटोदेखील शेअर करत असते.  त्या दोघांच्या सोशल मीडियावरील रोमँटिक फोटोंना नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. 


महत्त्वाच्या बातम्या :