Vicky Katrina Wedding : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. मागील दोन महिन्यापासून विकी-कतरिना यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं होतं. अखेर चर्चेवरून पडदा उठला असून 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा राज्यस्थानमध्ये पार पडणार आहे. विकी आणि कतरिना लग्नासाठी मुंबईवरुन राज्यस्थानसाठी रवाना झाले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या ठिकाणी कॅमेरा आणि मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नाची जाबाबदारी पार पाडणाऱ्या एजेन्सीनं फोटो अथवा व्हिडीओ लीक होऊ नये, याची पुर्ण काळझी घेतली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, विकी-कॅतरीनाच्या लग्नातील फुटेजसाठी एका ओटीटीनं मोठी ऑफर दिली आहे. पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार लग्नाच्या फुटेजसाठी विकी-कॅतरीनाला  100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. 


रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर ओटीटीकडून देण्यात आली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मला लग्नातील फोटो आणि व्हिडीओ स्ट्रीम करायचं आहे. त्याबदल्यात विकी-कॅतरिनाला 100 कोटींची ऑफर दिली आहे.दरम्यान, पाश्चात्य देशात सेलेब्रिटी लग्न करत असतील तर फुटेज मॅगझिन अथवा चॅनलला विकतात. अशातच आता भारतातीही हा ट्रेंड सुरु होणार का? याची उत्सुकाता चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.  सुत्रांच्या माहितीनुसार दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांनाही ओटीटीने ऑफर दिली होती. 


दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कतरिना आणि विकी यांचा तीन दिवस चालणारा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये होणार आहे. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. 7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 10 डिसेंबरला रिसेप्शनने या उत्सवाची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे. 


कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.