Ankita Lokhande Wedding News : बॉलिवूडमध्येदेखील सध्या लग्नसोहळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्याच्या दिवसांत अंकिता लोखंडे आणि विकी जैनदेखील विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नपत्रिकेची एक झलक समोर आलेली असली तरी कोणत्या दिवशी ते सात फेरे घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
येत्या काही दिवसांतच अंकिताचे विकीसोबत लग्न होणार आहे. कारण छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्यने (Shraddha Arya) अंकिता आणि विकीच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
ग्रॅंड हयातमध्ये पार पडणार लग्नसोहळाश्रद्धा आर्याने विकी आणि अंकिताच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नपत्रिका निळ्या रंगाची असून आकर्षक आहे. लग्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच एक आमंत्रण मंत्र दिसून येत आहे. या लग्नपत्रिकेवरून लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये पार पडणार असल्याचे दिसते आहे. लग्नपत्रिकेत लग्नाची तारीख दिसत नाही.
लग्नसोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरलअंकिता लोखंडेने सकाळी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही गोड फोटो शेअर केले आहेत. यावरून तिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते. अंकिताने आणि तिच्या प्रियकाराने आज त्यांच्या लग्नसोहळ्या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता आणि विकी जैनने शेअर केलेल्या फोटोंत त्यांचे नातेवाईकदेखील दिसत आहेत. अंकिताने गुलाबी सोनेरी बॉर्डर असलेली हिरव्या रंगाची साधी साडी नेसली आहे. मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीने कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. अंकिताने शेअर केलेल्या फोटोत ती विकीच्या मांडीवर बसलेली असून आनंदात दिसून येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha