Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding :   जवळपास संपूर्ण बॉलीवूड, देशाभरातले दिग्गज ते अमेरिकन पॉपस्टार रिहाना (Rihanna) देखील मार्च महिन्यात जामनगरमध्ये राधिका मर्चंट (Radhika Marchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या प्री वेडिंगसाठी भारतात आले होते. तीन दिवस या भव्य दिव्य सोहळ्याचा राजेशाही थाट या सर्वांनीच अनुभवला. या सोहळ्याला बिल गेट्स (Bill Gates), मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी देखील सहकुटुंब हजेरी लावली. पण प्रत्येक सोहळ्यात छोटी मोठी काहीतरी गडबड होतेच, तशीच गडबड या सोहळ्यातही झाली. कारण एका पेंडंटचा जवळपास साडेतीन तास शोध या सोहळ्यात सुरु होता. 


राधिका आणि अनंतच्या प्री वेडिंगमध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या बायकोची एक महत्त्वाची वस्तू हरवली होती. प्रिसिला   आणि मार्क यांनी अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये थीम नुसार त्यांचे कपडे ठरवले होते. त्यातही प्रिसिला चॅन विशेष सुंदर दिसत होती. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात अनेक कार्यक्रम होते. यातील एका कार्यक्रमामध्ये प्रिसिलाच एक पेंडंट हरवलं. 


नेमकं काय घडलं?


अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कॉकटेल पार्टीच्या रात्री मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन यांनी सुपर स्टायलिश असा ब्लक कलरच्या कपड्यांचं ट्विनिंग केलं होतं. तसेच दुसऱ्या दिवशी प्रिसिलाने राहुल मिश्राने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता. हा लेहंगा फार विशेष होता, कारण या सेटच्या क्रॉप टॉपमध्ये किसिंग क्रेन तयार करण्यात आल्या होत्या. तसेच त्यावर सोनेरी रंगाचे काम होते. तर तिसऱ्या दिवसासाठी प्रिसिलाने निळ्या रंगाची साडी नेसली होती. दुसऱ्या दिवशी प्रिसिलाने तिच्या ड्रेसमध्ये महागडं पेंडंट घातलं होतं. पण त्याच दिवशी तिचं ते पेंडंट हरवल्याचं लक्षात आहे. 






पेंडंट सापडलंच नाही 


ही गोष्ट लक्षात येता संपूर्ण सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. हे पेंडंट प्रिसिलासाठी अत्यंत महत्त्वाचे होते तसेच ते तिच्या फार आवडीचे होते. विशेष म्हणजे हे पेंडंट फार महागही होते. जवळपास हे पेंडंट शोधण्यासाठी साडेतीन तास वेळ घालवला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण ते पेंडंट सापडलच नाही.   






ही बातमी वाचा : 


Video : ऑरीचा अंबानींची सून राधिकासोबतचा गरबा डान्स पाहून बॉलिवूडच्या भूवया उंचावल्या! पाहा व्हिडीओ