Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Orry Garba Dance : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग विविध कारणाने अजूनही चर्चेत आहे. या कार्यक्रमात ऑरीनेदेखील (Orry) हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमातील ऑरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऑरी अंबानींची सून राधिका मर्चेंटसोबत (Radhika Merchant) गरबा डान्स करताना दिसत आहे.


ऑरीचा राधिकासोबत गरबा डान्स (Orry Shared Garba Dance Vidio with Radhika Merchant)


राधिका मर्चेंट आणि ऑरी यांचा गरबा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राधिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. तर ऑरीने नेहमीप्रमाणे अतरंगी अंदाजातील मल्टी कलर प्लेझर आणि पॅन्ट परिधान केली आहे. दरम्यान राधिका आणि ऑरीचा गरबा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. राधिका-ऑरीचा डान्स पाहून चाहत्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालालची (Jethalal) आठवण आली आहे.


ऑरीचा डान्स पाहून चाहत्यांना आठवला जेठालाला


ऑरी आणि राधिकाचा गरबा डान्स व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या लाडक्या जेठालालची आठवण आली आहे. भावाने जेठालाललाही मागे टाकलं, ऑरी नव्हे टप्पूचे वडील दिसत आहेत, एकदम दांडिया लागे छे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ऑरीने याआधी रिहानासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये ओरी रिहानालाला आपले कानातले देताना दिसून आला होता.






ऑरीने 13 हजार रुपयांची कानातले घालत केला राधिकासोबत डान्स


राधिका-अनंतच्या प्री-वेडिंगला ऑरी हटके अंदाजात सहभागी झाला होता. त्याने 13 हजार रुपयांचे कानातले घालून राधिकासोबत गरबा डान्स केला. ऑरी आणि राधिका एकमेकांचे खास मित्र आहे. त्यामुळे खास मैत्रिणीच्या प्री-वेडिंगला ऑरीने 72 लाख रुपयांचं घड्याळ परिधान केलं होतं. 


अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचं ऑरीने घेतलं चांगलच मानधन


ऑरी एखाद्या लग्नात प्रमुख पाहूणा म्हणून जातो तेव्हा तो 15 ते 30 लाख रुपये चार्ज करतो. तसेच फोटो काढण्याचे तो 15-20 लाख रुपये घेतो. एकंदरीतच ऑरी तासाभरात लाखो रुपये कमावतो. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचंही त्याने चांगलच मानधन घेतलं असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत आकडा समोर आलेला नाही.


संबंधित बातम्या


Radhika Merchant : अंबानीच्या सूनेनं भर कार्यक्रमात एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!