cement and long Tmt Price : आपल्याला स्वतंत्र, प्रशस्त असं घर (Home) असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अलिकडच्या काळात शहरात घर घेणं खूप महाग झालं आहे. दुसरीकडे स्वत:च्या जागेत घर बांधायचं तर बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याच्या दरात वाढ झालेली दिसतेय. पण आता ज्यांना घर बांधायचं आहे, त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. घर बांधण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे सिमेंट (cement) आणि सळई (steel TMT rebar) या दोन्ही वस्तूंच्या दरात घसरण झालीय. 


आता घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण सिमेंट आणि सळईच्या दरात घसरण झाली. याबाबतची माहिती सिमेंटच्या बाजारभावावर लक्ष ठेवणाऱ्या ICRA च्या अहवालात देण्यात आलीय. या अहवालात घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या दरात घसरण झाल्याची माहिती देण्यात आलीय. जाणून घेऊयात कोणत्या वस्तूंच्या दरात किती घट झाली? त्याबद्दल सविस्तर माहिती. 


कोणत्या वस्तूच्या किंमतीत किती घसरण?


घराचं बांधकाम करण्यासाठी सिमेंट आणि सळई हे दोन महत्वाचे घटक आहेत. सध्या सिमेंटच्या दरात 5 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सिमेंटच्या एका पोत्याचा दर हा 355 ते 375 रुपये आहे. तसेच दुसरीकडे सळईच्या दरातही घसरण झालीय. सध्या सळईचा दर हा 43,300 रुपये प्रति टन झाला आहे. जानेवारी महिन्यात हाच सळईचा दर  47,000 रुपये प्रति टनावर पोहोचला होता. यामध्ये जवळपास चार हजार रुपयांची घसरण झालीय. त्यामुळं घराचं बांधकाम करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. सध्या इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. बांधकाम क्षेत्रातही प्रगती दिसून येत आहेत. त्यामुळं बांधकाम क्षेत्रातील वाढीमुळं ही देशाच्या जीडीपीत देखील वाढ होताना दिसतेय. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Mhada Lottery : पुण्यात घराचं स्वप्त पूर्ण होणार; म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर, कसा कराल अर्ज?